Vaibhav Chavan Photos Instagram
मनोरंजन बातम्या

Bigg Boss : बिग बॉसच्या घरातून बाहेर पडताच वैभव झाला भावूक; म्हणाला, या व्यक्तीची येईल आठवण!

Bigg Boss Marathi: घनशायम दराडे, इरिना यांच्यानंतर आता वैभव चव्हाणही बिग बॉसच्या घऱातून बाहेर पडलाय.

Manasvi Choudhary

Bigg Boss Marathi News: महाराष्ट्राच्या मातीतला बारामतीचा रांगडा गडी म्हणजेच अभिनेता वैभव चव्हाणचा 'बिग बॉस मराठी'च्या घरातील प्रवास संपला आहे. या आठवड्यात वैभवसह अभिजीत सावंत, वर्षा उसगांवकर, निक्की तांबोळी, अंकिता वालावलकर सदस्य नॉमिनेट झाले होते. यात आर्याला बिग बॉसच्या घरातून घरचा रस्ता दाखवला होता. दरम्यान आता तर प्रेक्षकांच्या वोटिंगचा मान ठेवच वैभवला घर सोडावं लागलंय.

वैभव चव्हाणने आपल्या कातिल लूकने सर्वांनाच घायाळ केलं आहे. लढवैया, बिनधास्त आणि जिद्दी व्यक्तिमत्त्व असणारा वैभव 'बिग बॉस मराठी'चा खेळ खेळण्यात कुठेतरी कमी पडला. वैभव चव्हाण अशी ओळख मिळवण्यापेक्षा 'अरबाज 2' अशी ओळख त्याने मिळवली. कधी गद्दारी केल्याने तर कधी रांगड्या मातीत परदेशी प्रेमाचं रोपटं लावल्याने तो चर्चेत होता. आता वैभव घराबाहेर पडल्याने त्याच्या चाहत्यांना मात्र मोठा धक्का बसला आहे.

हिरो होण्याची वैभवला अनेकदा संधी मिळाली होती. रितेश भाऊनेदेखील त्याला वारंवार सांगितलं होतं. पण मिळालेल्या संधीचं वैभव सोनं करू शकला नाही. 'बिग बॉस मराठी'चा खेळ वैभव चांगला खेळला. पण तो आणखी चांगला खेळू शकला असता. इनव्हेस्टमेंट बॉक्समध्ये असलेले 50 पॉईंट्सच्या दोन कॉइनचे नॉमिनी वैभवने जान्हवी आणि अरबाजला दिले.

बिग बॉस मराठीच्या घराचा निरोप घेतल्यानंतर वैभव चव्हाण म्हणाला,"तुम्ही दिलेले सल्ले मी फॉलो करायला हवे होते. पण मिळालेल्या संधीचं सोनं करता आलं नाही याचं मला खरचं खूप दु:ख आहे. आता बाहेर पडल्यानंतर मला जान्हवीची खूप आठवण येईल. तर अरबाजसोबतची लढाई अजून बाकी आहे. बाकी सदस्यांना उत्तम खेळण्यासाठी शुभेच्छा देतो".

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

दुबार मतदार आढळला तर जागेवर फोडून काढा, मनसे- शिवसैनिकांना राज ठाकरेंचा आदेश|VIDEO

Raj Thackeray: शिवाजीपार्कमधील सभेत राज ठाकरेंनी का व्यक्त केली दिलगीरी, नेमकं काय घडलं?

एमआयएम-काँग्रेस युती, ड्रग्स ते बदलापूर बलात्कार प्रकरणाचा आरोपी नगरसेवक, राज ठाकरेंनी भाजपचे कपडेच फाडले|VIDEO

Raj Thackeray: राज ठाकरेंनी अदानींचा दाखवला 'तो' व्हिडिओ; Video पाहताच अख्खा महाराष्ट्र हादरला

Mumbai Politics: शिवाजी पार्कवर सभा, दुसरीकडे निष्ठावंत शिलेदाराचा भाजपात प्रवेश; राज ठाकरेंना मोठा धक्का

SCROLL FOR NEXT