RD Movie Adarsh Shinde Song Saam Tv
मनोरंजन बातम्या

Adarsh Shinde Song: आदर्श शिंदे म्हणतोय 'वढ पाचची'; 'आरडी' चित्रपटातलं धमाल गाणं लाँच

RD Movie Adarsh Shinde Song: 'आरडी' चित्रपटाच्या टीजरने प्रेक्षकांमध्ये चांगलीच चर्चा निर्माण केली आहे. आता या चित्रपटातलं आदर्श शिंदेने गायलेलं "वढ पाचची..." हे गाणं लाँच करण्यात आलं आहे

Shruti Vilas Kadam

Adarsh Shinde Song: एका चुकीमुळे आयुष्य बदलणाऱ्या कथानकावर आधारित 'आरडी' चित्रपटाच्या टीजरने प्रेक्षकांमध्ये चांगलीच चर्चा निर्माण केली आहे. आता या चित्रपटातलं "वढ पाचची..." हे गाणं लाँच करण्यात आलं असून, २१ मार्च रोजी 'आरडी' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

"वढ पाचची" हे अतिशय धमाल गाणं आहे. 'पार्टी साँग' असं हे गाणं आहे. हे गाणं गीतकार मंदार चोळकर लिखित कॅची शब्दरचना, वरूण लिखाते यांचे ताल धरायला लावणारं संगीत आणि सुप्रसिद्ध गायक आदर्श शिंदे यांच्या दमदार आवाजामुळे हे गाणं प्रत्येकाला नाचायला लावणारं आहे. आजवर अनेक चित्रपटांतून पार्टी साँग आली असली, तरी 'आरडी' चित्रपटातलं "वढ पाचची" हे गाणं आणखी वेगळं आणि मनोरंजक आहे.

साद एंटरटेन्मेंट, कमल एंटरप्रायझेस यांनी झेब्रा पिक्चर्स आणि हेलिक्स प्रॉडक्शन्स यांच्या सहाय्याने आरडी चित्रपटाची निर्मिती केली आहे. आदित्य नाईक, साहिल वढवेकर, हंसराज भक्तावाला, इस्तेखार अहमद शेख हे चित्रपटाचे निर्माते तर ऋग्वेद डेंगळे, शिवराज पवार, गणेश शिंदे हे सहनिर्माते आहेत. चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन गणेश शिंदे यांनी केलं आहे.

बी. आप्पासाहेब यांनी सहलेखन आणि सहदिग्दर्शन, हर्षवर्धन जाधव आणि मयूर सातपुते यांनी संकलन, तन्मय ढोक यांनी छायांकन, सुरेश पंडित, वरूण लिखाते यांनी संगीत दिग्दर्शन केलं आहे. चित्रपटात गणेश शिंदे, अवंतिका कवठेकर, राहुल फलटणकर, बुशरा शेख, केतन पवार, सानवी वाळके यांच्या प्रमुख भूमिका आहेत. 'आरडी' चित्रपट मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी आणखी थोडेच दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT