Vijay Sethupathi SAAM TV
मनोरंजन बातम्या

Vijay Sethupathi : 'इतका मोठा अभिनेता असून माज नाही', मराठी अभिनेत्रीने केलं 'विजय सेतुपती'चं कौतुक

Vijay Sethupathi Simplicity : विजय सेतुपती हा प्रसिद्ध अभिनेता आणि उत्तम चित्रपट निर्माता आहे. त्यांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. त्याच्या डाउन टू अर्थ स्वभावाची चर्चा मराठी सिनेसृष्टीतही पाहायला मिळत आहे.

Shreya Maskar

विजय सेतुपती हा बॉलिवूडमधील उत्तम अभिनेता आहे. तसेच त्यांनी अनेक चित्रपटांची निर्मिती देखील केली आहे. विजय सेतुपतीच्या स्वभावाचे सर्वत्र कौतुक होत आहे. अलिकडेच मराठी अभिनेत्री उषा नाडकर्णी (Usha Nadkarni) विजय सेतुपतीच कौतुक करताना पाहायला मिळाली. उषा नाडकर्णी मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे.

मराठी, हिंदी मालिकेत तसेच चित्रपटात त्यांनी आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. तसेच काही काळापूर्वीच उषा नाडकर्णी यांनी दाक्षिणात्य सिनेसृष्टीत पाऊल ठेवलं आहे. त्यांनी साऊथ सुपरस्टार विजय सेतुपतीसोबत स्क्रीन शेअर केली आहे. तिने एका मुलाखतीत आपला अनुभव सांगितला आहे.

मराठीतील दिग्गज अभिनेत्री उषा नाडकर्णी यांनी अलिकडेच दिलेल्या एका मीडिया मुलाखतीत साऊथ सुपरस्टार विजय सेतुपतीचे कौतुक केले आहे. त्याच्यासोबत काम करतानाचा आपला अनुभव शेअर केला आहे. 'गांधी टॉक्स' या चित्रपटाच्या माध्यमातून उषा नाडकर्णी यांनी साऊथ चित्रपटात पदार्पण केले आहे.

'गांधी टॉक्स' या चित्रपटात तिने अभिनेता विजय सेतुपतीच्या (Vijay Sethupathi) आईची भूमिका साकारली आहे. पहिल्यांदाच उषा नाडकर्णी आणि विजय सेतुपतीने स्क्रीन शेअर केली आहे. या चित्रपटादरम्यान त्यांनी खूप वेळ एकत्र घालवला आहे. उषा नाडकर्णी यांना विजय सेतुपतीचा साधा, मनमिळावू स्वभाव खूप भावला. एका उत्तम कालाकारचे हे योग्य उदाहरण आहे असे त्यांचे मत होते.

उषा नाडकर्णी मुलाखतीत म्हणाल्या की, साऊथचा सुपरस्टार विजय सेतुपती खूप चांगला माणूस आहे. मी 'गांधी टॉक्स' या चित्रपटात त्याच्या आईची भूमिका साकारली आहे. आपल्या मराठी आणि हिंदी इंडस्ट्रीत कुणाचे थोडे कौतुक केले किंवा थोडी प्रसिद्धी जरी मिळाली तरी ते लोक पटकन माज दाखवतात. विजय इतका मोठा माणूस आहे तरी जमिनीवर मांडी घालून बसला होता. आम्ही खूप गप्पा मारल्या. याच्याकडून साधेपणा शिकला पाहिजे. चित्रपटाच्या शेवटच्या दिवशी त्यांनी मला नमस्कार केला. मी विजयचे गाल ओढले कारण तो मला खूप आवडला. एवढा मोठा नट असून सुद्धा याला अजिबात माज नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs IRE: बेलफास्टमध्ये टीम इंडियाचा सुफडासाफ; आयर्लंडचा ऐतिहासिक विजय

केतन अग्रवाल हत्या प्रकरण नवी अपडेट: पोलिसांच्या नजरेतून वाचण्यासाठी चेतनने लढवली होती अनोखी शक्कल

Ben Stokes : भारत-इंग्लंडच्या सामन्यांआधी मोठी बातमी! दिग्गज क्रिकेटपटूची तडकाफडकी रिटायरमेंट, क्रिडाविश्वात खळबळ

Maharashtra News Live Update: बालबेडा जंगलात माओवाद्यांचा शस्त्रनिर्मिती कारखाना उद्ध्वस्त; पोलीस-सीआरपीएफची मोठी कारवाई

१,४०० किलोमीटर लांबी, ८ लेन; महाराष्ट्रासह पाच राज्यांना जोडणार द्रुतगती मार्ग, जाणून घ्या महामार्गाचे वैशिष्ट्ये

SCROLL FOR NEXT