Urmila Matondkar With Husband Instagaram @urmilamatondkarofficial
मनोरंजन बातम्या

Urmila Matondkar: उर्मिला मातोंडकरचा नवरा सुद्धा आहे प्रसिद्ध कलाकार, लग्नासाठी अभिनेत्रीने उचलेल टोकाचे पाऊल

सौंदर्य, नृत्य आणि अभिनयासोबतच उर्मिला तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही खूप चर्चेत असते.

Saam Tv

Urmila Matondkar Love Story: बॉलिवूडची रंगीला गर्ल उर्मिला मातोंडकर आज वाढदिवस आहे. उर्मिलाने अनेक दमदार चित्रपटांमध्ये काम केले आहे. बालकलाकार म्हणून तिने अभिनय क्षेत्रातील कारकिर्दीला सुरुवात केली होती. नरसिंह, चमटकर, रंगीला, शिकार, जुदाई, दौड, कुंवरा, दिवाने, एक हसीना थी अशा अनेक चित्रपटांतून उर्मिलाने तिच्या अभिनयाची जादू दाखवली.

सौंदर्य, नृत्य आणि अभिनयासोबतच उर्मिला तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही खूप चर्चेत असते. आज तिच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया तिच्या आयुष्याशी संबंधित आणि चित्रपट प्रवासाशी निगडित काही रंजक गोष्टी.

बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री उर्मिला मातोंडकरचा जन्म ४ फेब्रुवारी १९७४ रोजी झाला. उर्मिला मातोंडकरने अभिनय क्षेत्रातील प्रवासाची सुरुवात 'चामटकर' या सिनेमातून केली होती.

परंतु त्याचवर्षी म्हणजे 1995 मध्ये आलेल्या 'रंगीला' चित्रपटाने उर्मिलाला रातोरात हिट बनवले. या चित्रपटातील 'याई रे, याई रे' हे गाणे खूप गाजले. उर्मिलाने या चित्रपटात स्वीकारलेल्या शैलीमुळे 90 च्या दशकात फॅशन जगात मोठा बदल झाला.

उर्मिलाला मिळालेल्या यशामागे राम गोपाल वर्माचा वरदहस्त होता असे म्हटले जाते. उर्मिलाने राम गोपाल वर्मासोबत एकूण 13 चित्रपटांमध्ये काम केले. उर्मिला आणि राम गोपाल वर्मा यांच्या कथित अफेअरच्या बातम्याही तेव्हा रंगल्या होत्या. राम गोपाल वर्माला उर्मिलाची इतकी काळजी होती की त्याच्या चित्रपटांमध्ये तिच्यासाठी भूमिका असायचीच.

उर्मिला मातोंडकरने वयाच्या 42 व्या वर्षी मोहसीन मीर या तिच्यापेक्षा नऊ वर्षांनी लहान मॉडेल आणि व्यवसायिकासोबत लग्न केले. 'लक बाय चान्स' या बॉलिवूड चित्रपटामुळे मोहसीन लोकप्रिय झाला होता. आता उर्मिला राजकारणात सक्रिय आहे. तसेच उर्मिला सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि तिचे फोटो आणि व्हिडिओ तिच्या चाहत्यांसोबत शेअर करत असते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vijay Deverakonda : विजय देवरकोंडाची कडक ॲक्शन; 'किंगडम'चा जबरी ट्रेलर, पाहा VIDEO

Needle-free injection Nagpur: सुई, सूज, वेदना यापैकी काहीच नाही! नागपुरात मिळतंय सुईशिवाय इंजेक्शन

Maharashtra Live News Update: रोहिणी खडसे घेणार पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांची भेट

Hindi Sakti : हिंदी सक्तीविरोधात शालेय अभ्यासक्रमात मोठे बदल | VIDEO

Weight loss tips : आता वजन कमी करण्यासाठी व्यायामाची गरज नाही, फक्त या ३ गोष्टी लक्षात ठेवा

SCROLL FOR NEXT