Urmila Kothare Car Accident Post : मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री उर्मिला कानिटकर कोठारे हिच्या गाडीचा २८ डिसेंबर रोजी मोठा अपघात झाला होता. या अपघातात १ मजुराचा मृत्यू झाला असून १ मजूर गंबीर जखमी झाला होता. तर उर्मिला आणि तिचा ड्राइव्हर देखील जखमी झाले होते. अपघाताच्या १५ दिवसांनी रुग्णालयातून घरी परत आल्यावर उर्मिलाने एका पोस्टद्वारे सगळं प्रकार सांगितलं आहे. परंतु या पोस्टमध्ये कुठेही मृत आणि अपघात झालेल्या मजुरांचा उल्लेख नसल्याने नेटकरी संताप व्यक्त करत आहेत.
गणपतीच्या पाया पडतानाचा फोटो पोस्ट करत उर्मिलाने लिहिले, २८ डिसेंबर २०२४ रोजी रात्री १२.४५ च्या सुमारास माझा एक गंभीर कार अपघात झाला. रात्री पोईसर मेट्रो स्टेशनजवळ पश्चिम द्रुतगती महामार्गावर मेट्रोचे काम सुरू असताना, मोठी यंत्रसामग्री आणि जेसीबी लोडर?एक्सकॅव्हेटर उभी होती. माझा ड्रायव्हर गाडी चालवत होता. अचानक वळण आले, ज्यामुळे हा दुर्दैवी अपघात झाला.
या धडकेनंतर मी आणि माझा ड्रायव्हर गंभीर जखमी झालो आणि बेशुद्ध पडलो. सुदैवाने, आम्हाला ताबडतोब रुग्णालयात नेण्यात आले. मुंबई पोलिस आणि डिलिव्हरी कर्मचारी श्री. पवन शिंदे यांचे आभार, ज्यांनी तात्काळ कारवाई केली आणि आम्हाला रुग्णालयात हलवले. मी आता घरी आहे. मला अजूनही पाठीला आणि बरगड्यांना गंभीर दुखापत झाली आहे आणि डॉक्टरांनी मला किमान ४ आठवडे कोणताही शारीरिक व्यायाम न करण्याचा सल्ला दिला आहे.बाप्पाचे आभार हा कितीही वाईट असू शकते. माझ्या सर्व चाहत्यांचे आणि हितचिंतकांचे आभार ज्यांनी काळजी केली आणि माझ्या लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना केली. हा एक गंभीर अपघात होता आणि माझ्या ड्रायव्हरविरुद्ध पोलिसांनी एफआयआर नोंदवला आहे. मला आपल्या न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. मला माहित आहे की न्याय मिळेल.
या पोस्टखाली नेटकरी तू वाचलीस पण त्या माणसाचं काय त्या परिवाराच काय असे प्रश्न उर्मिलाला विचारात आहेत. एका नेटकाऱ्याने लिहिले काळजी लोकांची पण घ्या , रस्त्यावर चालणाऱ्या. तर दुसऱ्याने ताई आपण आपला व आपल्या चालकाचा उल्लेख घटनाक्रमाने केला पण घटनास्थळी निष्पाप जीव गमावलेल्या मजुराबाबतीत आपण एक शब्द पण बोलले नाही? असं का ? अशी विचारणा केली आहे. अशा अनेक कमेंट तिच्या या पोस्टखाली पाहायला मिळत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.