Urfi Javed in Woman Commission Office Saam Tv
मनोरंजन बातम्या

Urfi Javed Controversy: उर्फी महिला आयोग अध्यक्षांच्या भेटीला, कपडे, गॉगल पाहून सर्वच चकित

उर्फीच्या व्हाईट अँड ब्लॅक कपड्यांनी वेधले लक्ष.

Pooja Dange

Urfi Javed and Chitra Wagh: उर्फी जावेद आणि चित्रा वाघ यांच्या वादाची सर्वत्र चर्चा आहे. आज उर्फीने चित्रा वाघ यांच्या विरोधात महिला आयोगाकडे ऑनलाईन तक्रार दाखल केली आहे. लेखी तक्रार दाखल करण्यासाठी उर्फी वाघ महिला आयोगाच्या कार्यालयात दाखल झाली आहे. यावेळी देखील तिच्या लूकची चर्चा होत आहे.

उर्फी आज साडेबाराच्या सुमारास महिला आयोगाच्या कार्यालयात दाखल झाली होती. यावेळी तिच्यासोबत तिचे वकील सुद्धा होते. कडक सुरक्षा व्यवस्थेत उर्फीने रूपाली चाकणकर, महिला अयोग्य अध्यक्ष यांची भेट घेतली.

उर्फीने यावेळी देखील स्वॅगमध्ये एन्ट्री केली. उर्फीने यावेळी व्हाईट क्रॉप टॉप आणि ब्लॅक पॅन्ट घातली होती. पण सर्वांचे लक्ष वेधले ते तिच्या गॉगलने. उर्फी काळ्या रंगाचा चौकोनी आकाराचा मोठा गॉगल घातला होता. चेहऱ्यापेक्षा गॉगल जड अशी परिस्थिती यावेळी दिसत होती. तसेच तिने घातलेल्या व्हाईट क्रॉप टॉपवर 'नॉट अ नेपो बेबी' असं तिच्या टॉपवर लिहिलं होतं. उर्फीने महिला आयोगाच्या कार्यालयात जाताना देखील तिच्या कपड्यांच्या माध्यमातून अनेकांवर निशाणा साधला आहे.

उर्फीने चित्रा वाघ यांच्याविरोधात केलेल्या तक्रारीमध्ये चित्रा वाघ यांनी तिला धमकावल्याचे आणि जीवाला हानी पोचविल्याचे आरोप केले आहेत. चित्रा वाघ आणि उर्फी यांचा हा वाद गेले अनेक दिवस सुरू आहे. दोघीही एकमेकींवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. आता उर्फीने चित्रा वाघ यांच्या विरोधात महिला आयोगाकडे तक्रार केली आहे.

उर्फी जावेदच्या निर्णयानंतर चित्रा वाघ देखील आक्रमक झाल्या आहेत. त्यांनी बीडमध्ये पत्रकार परिषद घेत उर्फीवर निशाणा साधला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Tourism : सुट्टीमध्ये करा पुणेकरांच्या आवडत्या वीकेंड डेस्टिनेशनची सफर, 'हे' ठिकाण पावसाळ्यात मन मोहून टाकते

Brain Tumor Symptom: हे 1 सायलेंट लक्षण दिसलं तर समजा मेंदूमध्य तयार होतोय ट्यूमर

Maharashtra News Live Update: पुण्यात कॉक्रोज जनता पार्टीचं आंदोलन

Tuesday Horoscope : रोमॅंटिक दिवस जाईल, ५ राशींचे भाग्य उजळणार, वाचा मंगळवारचे राशीभविष्य

आंध्र प्रदेशातील स्टील प्रकल्पात मोठा स्फोट; ८ मजुरांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT