Urfi Javed Tweet Saam Tv
मनोरंजन बातम्या

Urfi Javed Tweet: 'नंगे तो सभी है भाई...' उर्फीचा निशाणा नेमका कोणावर?

उर्फीने नुकतंच तिला डिवचणाऱ्यांवर प्रतिक्रिया दिली आहे, त्यामुळे ती पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे.

Chetan Bodke

Urfi Javed Tweet: फॅशनच्या बाबतीत भल्याभल्यांना मागे टाकणाऱ्या उर्फीची नेहमीच सोशल मीडियावर चर्चा असते. तिच्या फॅशनने अनेकांना अळी मिळी गुप चिळी केलं आहे. सध्या उर्फी आपल्या कपड्यांच्या स्टाईलमध्ये कोणत्याही गोष्टीचा वापर करुन ती फॅशन करण्याचा प्रयत्न करते. नेहमीच ट्रोल होणारी उर्फी कोणीही कितीही बोलु द्या त्यांच्याकडे कधी लक्ष देत नाही. आता तर उर्फीनं तिला डिवचणाऱ्यांवर जी प्रतिक्रिया दिली आहे त्यामुळे ती पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे.

उर्फीच्या एका मित्रानं तिच्याविषयी धक्कादायक खुलासा करुन मोठी खळबळ उडवून दिली होती. फैझान अन्सारीनं उर्फी ही तृतीयपंथीय असल्याचे सांगत आपल्याकडे त्याबाबत पुरावे असल्याची माहिती दिली होती. त्यावर अद्याप उर्फीची कोणती प्रतिक्रिया आलेली नाही.मात्र तिच्या एका ट्विटनं पुन्हा एकदा नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. आपण आपल्या बोल्डनेसचे जे काही प्रदर्शन करतो आहे त्याच्याविषयी लोकांची मतं आहे ते कशी चुकीची आहेत यावर उर्फीनं सांगितलं आहे.

उर्फी नेहमीच सोशल मीडियावर तिच्या फॅशनच्या व्हिडीओ शेअर करते, उर्फीनं नुकतेच तिच्या ट्विटमध्ये म्हटले की, नग्न तर सारेच असतात. मी फक्त तुम्हाला कपड्यांच्या माध्यमातून सांगते तर काही जण त्यांच्या विचारानं तुम्हाला त्यांच्यातील नग्नता समजावून सांगत असतात. त्यामुळे बऱ्याचदा मला माझ्या राहणीमानावरुन जे काही बोलतात याचे मला काहीही वाटत नाही. लोकं काही समजावून घ्यायला तयार नाहीत.

उर्फीच्या या ट्विटवर नेटकऱ्यांनी कमेंटस करत ट्रोल केले आहे. एक युजर म्हणतो, तुम्ही जे म्हणत आहात ते बरोबर आहेत. कारण तुमचे जसे कपडे आहेत तशीच तुमची विचार करण्याची पद्धतही आहे. अशा शब्दांत उर्फीनं तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Weight Loss Tips: वजन कमी करायचंय? मग आजपासून सोडा 'या' ७ सवयी, न्यूट्रिशनिस्टने सांगितले वेट लॉसचे नियम

Maharashtra News Live Update: गोविंद बागेत शरद पवारांकडून ‘शरद मॅंगो’ची लागवड आणि AI तंत्रज्ञानाधारित ऊस पिकाची पाहणी

Bullet Train: मुंबई-पुणे प्रवास फक्त 40 मिनिटांत; पुणे, सोलापूरसह 25 हून अधिक शहरं जोडली जाणार! हायस्पीड रेल्वे प्रकल्पाला वेग

Churchgate Tourism : काळे ढग, रिमझिम पाऊस अन् हिरवीगार मुंबई! वीकेंडला फिरा 'ही' ५ निसर्गरम्य ठिकाणे

३ वर्षे काम केलं, पैसे मिळाले नाहीत! २०० कोटींच्या थकीत बिलांसाठी ठेकेदार आक्रमक

SCROLL FOR NEXT