Urfi Javed Saam Tv
मनोरंजन बातम्या

Urfi Javed: आधी चेहऱ्यावर जखम, आता हातावर चटका; उर्फीला पुन्हा काय झालं, चाहते चिंतेत

Urfi Javed Injured: उर्फी जावेद सोशल मीडियावर सध्या मोठ्या चर्चेत आहे. याचे कारण फक्त तिचे फॅशन सेन्स नाही तर तिला सध्या लागत असलेल्या जखमा आहेत. आता पुन्हा एकदा उर्फीला जखम झाली आहे.

Shruti Vilas Kadam

Urfi Javed Injured: 'ट्रेटर्स' सारखा रिअॅलिटी शो जिंकल्यानंतर, उर्फी जावेद तिच्या जुन्या कामात व्यस्त झाली. ती तिच्या बोल्ड फॅशनमुळे पुन्हा चर्चेत आहे. अलीकडेच उर्फी जावेद एका क्रिएटिव्ह काळ्या ड्रेसमध्ये दिसली. पण उर्फीच्या हाताला झालेल्या दुखापतीने ड्रेसपेक्षा जास्त लक्ष वेधले आहे. उर्फीच्या हाताला झालेल्या दुखापतीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हातावर लालसर चट्टा

व्हायरल व्हिडिओमध्ये, जेव्हा उर्फी गाडीतून उतरते तेव्हा ती काळ्या ड्रेसमध्ये दिसली, जो वेगळ्या पद्धतीने बनवला गेला होता. ती हसते आणि पापाराझींसाठी पोझ देते. दरम्यान, अचानक हातावर लाल रंगाचा डाग दिसतो. असे दिसते की ते हात भाजल्याच्या खूण आहे. या आधीही उर्फीच्या चेहऱ्याला मांजरीने बोचकारल्यामुळे जखम झाली होती आणि आता हे त्यामुळे चाहते चिंतेत आहेत.

युजर्सनी ड्रेसबद्दल ट्रोल केले

सोशल मीडियावर उर्फीच्या या व्हिडिओवर देखील अनेक कमेंट आल्या आहेत. काहींनी तिच्यासाठी चिंता व्यक्त केली तर, काहींनी तिच्या ड्रेसवरुन तिला ट्रोल केल. नेटकऱ्याने लिहिले की, 'या ड्रेसला मी काय म्हणू, साडी की अपूर्ण साडी.' दुसऱ्या नेटकऱ्याने कमेंट केली, 'हा ड्रेस आहे का?' काही लोकांनी उर्फीच्या ड्रेसची खिल्ली उडवली, तर काही नेटकऱ्यानी उर्फीसाठी फायर इमोजी शेअर केल्या.

उर्फी जावेदने अनेक रिअॅलिटी शो केले आहेत

उर्फी जावेदच्या कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर, गेल्या वर्षी तिच्या आयुष्यावर 'फॉलो कर लो यार' हा रिअॅलिटी शो बनवण्यात आला होता. या वर्षी ती 'एंगेज्ड रोका या धोखा' हा शो होस्ट करताना दिसली. अलीकडेच ती 'द ट्रेटर्स' या रिअॅलिटी शोमध्ये दिसली. यासह उर्फी सोशल मीडियावरही सक्रिय असते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: आमदार सदाभाऊ खोत रस्त्यावर, ढोलवादन करत लेझीम खेळून डीजे बंदीची मागणी

Gram Panchayat: ग्रामीण राजकारणात बदल! मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; सरपंचांचे अधिकार संपले?

विधानसभेत अभूतपूर्व गदारोळ! केसीआर यांच्या मुलासह २२ आमदारांचे निलंबन, राजकीय वर्तुळात खळबळ

Myopia in children: मोबाईल-टॅबलेटच्या अतिवापरामुळे मुलांच्या डोळ्यांवर गंभीर परिणाम? पालकांनी ‘ही’ लक्षणं अजिबात दुर्लक्ष करू नयेत

Employee Bonus : २१,००० पर्यंत पगार असणाऱ्या नोकरदारांसाठी आनंदाची बातमी; बोनसच्या नियमात मोठा बदल, पाहा सविस्तर माहिती

SCROLL FOR NEXT