Urfi Javed: चित्रा वाघ यांनी उर्फी जावेद आणि तिच्या स्टाईलबाबत आक्षेप घेतला. यानंतर आता उर्फीने चित्रा वाघ यांना तिखट शब्दांत प्रत्युत्तर दिलंय. धक्कादायक बाब म्हणजे चित्रा वाघ यांना सुनावण्याच्या नादात उर्फीने पातळी सोडून भाषा वापरल्याचं पाहायला मिळालं आहे. चक्क शिव्या देत उर्फी जावेद हिने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. यात तिने चित्रा वाघ यांना सवाल केलेत.
मात्र उर्फीने वापरलेली भाषा कितपत योग्य होती, असा सवाल आता उपस्थित केला जातोय. सोशल मीडियावर सध्या ऊर्फी जावेद सर्वाधिक चर्चेत आहे. तिच्या फॅशन सेन्समुळे तिला सर्वच स्तरातून ट्रोल केले जाते. एकदा तिला पोलिसांनी तिच्या विचित्र कपड्यांमुळेही ताब्यात घेतलं होतं. सध्या ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. नुकताच भाजप नेत्या आणि उर्फी जावेद यांच्यातील वाद बराच विकोपाला गेला आहे.
चित्रा वाघ यांनी मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्याकडे पत्र लिहीत विचित्र कपडे परिधान करत मुंबईतील रस्त्यांवर फिरणाऱ्या उर्फी जावेदबद्दल तक्रार दाखल केली आहे. ‘उर्फी जावेदरुपी स्त्री देहाचा बाजार रोखा’ अशी मागणी केली आहे. याबद्दल चित्रा वाघ यांनी एक ट्वीटही केले आहे. या एकूण वादात आता उर्फी जावेदने चित्रा वाघ यांना शिवीगाळ करत आपले उत्तर दिले आहे.
उर्फी विरोधात पोलिसांना दिलेल्या पत्रात भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी लिहिले की, “केवळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी या अभिनेत्रीने आपल्या देहाचा मांडलेला बाजार चीड आणणारा आहे. तिला आपल्या देहाचे प्रदर्शन करायचे असेल तर तिने ते चार भिंतीच्या आड जरुर करावे, मात्र अशा पद्धतीच्या भावना चेतवणाऱ्या कृत्याने समाजातील विकृत मनोवृत्तीला आपण खतपाणी घालत आहोत, याची या अभिनेत्रीला जाणीव नसेल. या कृत्याबद्दल सदर अभिनेत्रीवर तातडीने संबंधित कायद्यानुसार कठोर कारवाई करावी, अशी भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाची मागणी आहे.”
उर्फी जावेद सोशल मीडियाच्या माध्यमातून चित्र वाघ यांच्यावर आरोप करत म्हणते, “माझ्या नवीन वर्षाची सुरुवातच पोलिस तक्रारीने झाली आहे. या राजकारण्यांना काही कामं नाहीत का? या राजकारण्यांना, वकिलांना कळत नाही का? आपल्या संविधानात असा कोणताच नियम नाही ज्यानुसार ही लोकं मला जेलमध्ये पाठवू शकतील. "
"माझे निप्पल व व्हजायना जोपर्यंत दिसत नाही तोपर्यंत मला कोणीही तुरुंगात टाकू शकत नाही. तुम्हाला फक्त माध्यमांचे लक्ष वेधून घ्यायचे आहे. चित्रा वाघ, मी तुम्हाला आणखी चांगल्या कल्पना देते, तुम्ही सेक्स ट्रॅफिकिंग विरुद्ध काम करा, अवैध डान्स बारवर बंदी आणा, अवैध देहविक्री व्यवसायावर बंदी आणा, या सर्व समस्या मुंबईत आहेत त्यांच्याकडे लक्ष द्या."
भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी शनिवारी मुंबई पोलीसांकडे ट्वीट करत मागणी केली की,'शी…ऽऽऽऽ अरे..हे काय चाललयं मुंबईत. रस्त्यांवर सार्वजनिक ठीकाणी उत्तानपणे नंगटपणा करणारी ही बाई, हिला रोखायला मुंबई पोलिसांकडे IPC/CRPC आहेत की नाही, तात्काळ बेड्या ठोका हीला. एकीकडे निष्पाप महिला/मुली विकृतांच्या शिकार होताहेत तर ही बया अजून विकृती पसरवतीये.' चित्रा वाघ यांच्या या ट्वीटवर आता उर्फीनेही प्रत्युत्तर दिले आहे.
उर्फीच्या या शिवराळ भाषेतील ट्विटने आणखी एक नवा वाद निर्माण होणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. चित्रा वाघ यांच्या तक्रारीनंतर काय कारवाई होणार का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.