Urfi Javed Saam Tv
मनोरंजन बातम्या

Urfi Javed: उर्फीची 'खतरों के खिलाडी १३'मधून एक्झिट, लवकरच चाहत्यांना देणार नवी 'गुड न्यूज'

उर्फी 'खतरों के खिलाडी १३'च्या आगामी भागात येणार असल्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून होत आहे. नुकतेच तिचे या शो संबंधित माहिती मिळाली आहे.

Chetan Bodke

Urfi Javed Exit Khatron Ke Khiladi 13: सोशल मीडिया सेन्सेशन उर्फी जावेद तिच्या बोल्ड आणि हटक्या फॅशन सेन्समुळे नेहमीच चर्चेत राहते. मात्र, उर्फी तिच्या विचित्र ड्रेसिंग स्टाइलमुळे नेहमीच ट्रोल होत असते. अलीकडेच, उर्फी 'खतरों के खिलाडी १३'च्या आगामी भागात येणार असल्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून होत आहे. मात्र, आता उर्फी रिॲलिटी शोच्या आगामी सीझनचा भाग नसल्याचे बोलले जात आहे.

एका इंग्रजी संकेतस्थळाने दिलेल्या माहितीनुसार, अभिनेत्रीच्या जवळच्या सूत्रांनी सांगितले की, उर्फी 'खतरों के खिलाडी १३' च्या टीमसोबत बऱ्याच दिवसांपासून चर्चा करत होती आणि ती तयार असल्याच्या अनेकदा बातम्या व्हायरल झाल्या होत्या. तिला या शोमध्ये सहभागी व्हायचे होते, पण ती या शोमध्ये काही कारणास्तव सहभागी होत नाही.

ती एका मोठ्या प्रोजेक्टसाठी निर्मात्यांसोबत बोलणी करत होती आणि ती खतरों के खिलाडीची ऑफर स्वीकारण्यापूर्वीच दुसऱ्या प्रोजेक्टसाठी फायनल झाली होती, त्यामुळे तिला शो सोडावा लागला आहे. जरी अभिनेत्री तिच्या मोठ्या प्रोजेक्टबद्दल खूप उत्साहित असली तरी, उर्फी ही बातमी लवकरच तिच्या चाहत्यांशी शेअर करणार आहे.

उर्फी सध्या तिच्या बिनधास्त कामगिरीमुळे बरीच चर्चेत आली आहे. ती अलीकडेच एका साऊथ मॅगझिनच्या डिजिटल कव्हरवर डिझायनर कपड्यांमध्ये दिसली होती. ती प्रसिद्ध डिझायनर जोडी अबू जानी आणि संदीप खोसला यांच्या नवीन कलेक्शनची मॉडेल देखील बनली. उर्फी शेवटची स्प्लिट्सविला X4 मध्ये मिशिफ मेकर म्हणून दिसली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bollywood Actress : साऊथ चित्रपटात काम करणे कठीण; लोकांनी केल्या शरीरावर कमेंट्स, अभिनेत्री गेली होती ट्रॉमामध्ये

Maharashtra Live News Update : सोलापुरात सापडला भारतातील सर्वात मोठा दगडी चक्रव्यूह

Kalyan Traffic : कल्याण पूर्व-पश्चिमला जोडणारा उड्डाणपूल बंद, २० दिवसांसाठी पर्यायी मार्ग, वाचा सविस्तर

Shocking : संभाजीनगर हादरलं! रक्ताच्या थारोळ्यात गळा चिरलेल्या अवस्थेत आढळली १७ वर्षीय तरुणी; नेमकं काय घडलं?

Breakfast Recipe: पौष्टिक आणि चवदार, ऑफिसला जाण्यापूर्वी नवऱ्यासाठी बनवा हे 4 नाश्ता प्रकार

SCROLL FOR NEXT