Sari Poster Out
Sari Poster OutInstagram/ @shrotriritikaofficial

Sari The Film: दो फूल, एक माली... प्रेमाची जादू दाखवणाऱ्या 'सरी'चं रोमँटिक पोस्टर प्रदर्शित

Sari Marathi Movie: प्रेमाचा त्रिकोण असलेल्या 'सरी' चित्रपटाचा पोस्टर नुकताच प्रदर्शित झाला आहे.
Published on

Sari Poster Out: आयुष्य कधीतरी एका अशा वळणावर येतं, जिथे पुढे काय होणार आहे, हे कोणीच सांगू शकत नाही. म्हणूनच म्हणतात की, 'लाईफ इज फुल्ल ऑफ सरप्राइजेस अँड मिरॅकल्स' याच आशयाचा 'सरी' चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर झळकले असून येत्या ५ मे रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

Sari Poster Out
Shubhangi Atre: अंगुरी भाभीचा तब्बल १९ वर्षांचा संसार मोडला, 'या'कारणामुळे घेतला घटस्फोट...

प्रेमाचा त्रिकोण असलेल्या या चित्रपटात अजिंक्य राऊत, रितिका श्रोत्री, पृथ्वी अंबर आणि मृणाल कुलकर्णी प्रमुख भूमिकेत दिसतील. कॅनरस प्रॉडक्शन्स प्रस्तुत, डॉ. सुरेश नागपाल, आकाश नागपाल निर्मित या चित्रपटाचे लेखन, संकलन आणि दिग्दर्शन अशोका के. एस. यांनी केले असून दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील नामवंत दिग्दर्शक अशोका के. एस. आणि अभिनेता पृथ्वी अंबर 'सरी'च्या निमित्ताने प्रथमच मराठीत पदार्पण करत आहेत. रिलायन्स एंटरटेनमेंटने या चित्रपटाच्या वितरणाची धुरा सांभाळली आहे.

चित्रपटाबद्दल दिग्दर्शक अशोका के. एस. म्हणतात, "मी प्रथमच मराठीत चित्रपट दिग्दर्शित करत आहे. मराठी चित्रपटांत काम करताना मला एक वेगळाच आनंद मिळाला. मराठी कलाकार अतिशय प्रतिभाशाली आहेत. चित्रपटाबद्दल सांगायचं तर ही एक प्रेमकहाणी आहे. प्रेमात पडलेल्या तरुणतरुणींच्या आयुष्यात अनेक वळणे येतात, अनेक आश्चर्यकारक घटना घडतात, चमत्कार घडतात, ज्यांचा कधी कोणी विचारही केलेला नसतो. मनाला भिडणारी ही कथा आहे, जी प्रेक्षकांना नक्कीच भावेल."

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com