Urfi Javed And Shah Rukh Khan
Urfi Javed And Shah Rukh Khan Saam Tv
मनोरंजन बातम्या

Urfi Javed Video: नाद करा पण उर्फीचा कुठं... म्हणते, 'मला बॅन करा, पण शाहरुख खानची...'

Chetan Bodke

Urfi Javed Video: शाहरुख खानचा चित्रपट 'पठान' बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. हा चित्रपट कमाईच्या बाबतीत रोज नवनवे रेकॉर्ड बनवत आहे. दरम्यान, बिग बॉस ओटीटी फेम आणि सोशल मीडिया सेन्सेशन उर्फी जावेदचे प्रेम शाहरुख खानवर उभारुन आले आहे. तिला शाहरुखची दुसरी पत्नी व्हायचे आहे, असे तिने थेट माध्यमांसमोरच आपले मत स्पष्ट केले आहे.

उर्फी जावेद अलीकडेच मुंबईतील एका रेस्टॉरंटबाहेर स्पॉट झाली होती. यादरम्यान पापाराझींनी तिला 'पठान' बद्दल प्रश्न विचारला असून चित्रपटावर बहिष्कार टाकणाऱ्या टोळीला तुम्ही काय सांगाल? या प्रश्नाचे उत्तर देत उर्फी म्हणते, 'मला बॅन करा, पण शाहरुख खानचा चित्रपट बघा.' यानंतर तिला शाहरुख खानसाठी काय म्हणायचे आहे असे विचारले असता तिने उत्तर दिले, 'शाहरुख खान आय लव्ह यू. कृपया मला तुझी दुसरी पत्नी बनव.'

शाहरुख खानच्या 'पठान' चित्रपटात दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम यांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत. यशराजचा हा स्पाय युनिव्हर्स असलेला चौथा चित्रपट आहे. या चित्रपटात शाहरुख खानने पठान नावाच्या रॉ एजंटची भूमिका साकारली होती. त्याचबरोबर जॉन अब्राहम खलनायक बनला आहे. विशेष म्हणजे सलमान खान शाहरुखच्या पठानमध्ये पाहुणा कलाकार आहे.

शाहरुख खान चार वर्षांनंतर 'पठान'मधून मोठ्या पडद्यावर झळकला आहे. २५ जानेवारीला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने पहिल्याच दिवशी ५५ कोटींची कमाई करून इतिहास रचला. या चित्रपटाने गेल्या तीन दिवसांत जगभरात 300 कोटींहून अधिक कमाई केली आहे. दररोज चित्रपटाची कमाई झपाट्याने वाढत आहे.

'पठान'नंतर आता शाहरुख खान 1 फेब्रुवारीपासून 'जवान'च्या शूटिंगला सुरुवात करणार असून, तो पुढील 6 दिवस शूटिंगमध्ये व्यग्र होता. त्याच्या आगामी चित्रपटासाठी शाहरुख अॅक्शन सीन शूट करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

RCB vs CSK IPL 2024: नॉकऑउट सामन्यात आरसीबी २००पार; CSK समोर २१९ धावांचं आव्हान

TVS ची ही बाईक देते 65 Kmpl मायलेज, फक्त लूक नाही फीचर्सही हाय क्लास; जाणून घ्या किंमत

Special Report : फिक्स झालं, जरांगे पाटील आता थेट विधानसभा निवडणुकीच्या मैदानात!

Special Report : भाजप झाला मोठा, संघ झाला मोठा? नड्डांच्या वक्तव्याने भाजपवर सारवासारवची वेळ?

Jayant Patil On Raj Thackeray | लाव रे तो व्हिडीओ दाखवणाऱ्या ठाकरेंची पाटलांनी थेट क्लिपच ऐकवली

SCROLL FOR NEXT