Urfi Javed  Saam Tv
मनोरंजन बातम्या

उर्फी जावेद म्हणाली, 'मी एक दिवस कपडेच...'

उर्फी जावेद ही सोशल मीडिया सेन्सेशन आहे. नुकतेच तिने एक मोठे विधान केले आहे, जे ऐकल्यानंतर तिचे चाहतेच नाही तर ट्रोलर देखील हैराण झाले आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : उर्फी जावेद (Urfi Javed) ही सोशल मीडिया सेन्सेशन (Social Media) आहे. आपल्या स्टाइल आणि कपड्यांमुळे नेहमीच चर्चेत राहणाऱ्या उर्फीला कोणत्याही विषयावर स्पष्टपणे कसे बोलावे, हे देखील माहीत आहे. सध्या चित्रपट, मालिका, वेब सीरीज आणि मोठमोठ्या म्युझिक व्हिडिओपासून उर्फी दूर असली तरी ती रोजच चर्चेत असते. नुकतेच तिने एक मोठे विधान केले आहे, जे ऐकल्यानंतर तिचे चाहतेच नाही तर ट्रोलर देखील हैराण झाले आहेत.

उर्फी जावेद नेहमीच प्रसारमाध्यमांशी बोलताना दिसत असते. मुंबईच्या मुसळधार पावसात नुकतीच ती बोल्ड लूकमध्ये बाहेर पडली होती. तेव्हा तिने एक वक्तव्य केली. ते ऐकून तिच्यावर टीका करणाऱ्यांनाही समजलं असेल की, ती आता त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून बिनधास्तपणे जगायला शिकली आहे.

जेव्हा पत्रकारांनी तिला तिच्या बोल्ड लूकबद्दल विचारले तेव्हा ती म्हणाली, 'मी एक दिवस कपडे घालणार नाही. म्हणजे चर्चाच संपली. काय आहे यार, प्रेक्षकांना चकित करावं म्हणून मी वेगवेगळे लूक नाही करत, मला जे आवडते तेच मी नेहमी घालते'.

उर्फीने सांगितले की ती लोकांना आश्चर्यचकित करण्यासाठी नाही, तर तिच्या आवडीमुळे असे कपडे घालते. यादरम्यान तिने स्काय ब्लू वन पीस घातला होता, ज्यामध्ये फ्रंट कट होता. ड्रेससोबतच तिची हेअरस्टाईलही लोकांचे लक्ष वेधून घेत होती.

उर्फीच्या या व्हिडिओवरून तिला मोठ्या प्रमाणात ट्रोल केले जात आहे. उर्फीने अनेकवेळा सांगितले आहे की, आता तिला ट्रोल केल्याने फरक पडत नाही. नुकतेच एका फॅशन ब्रॅण्डसोबत संवाद साधताना उर्फीने सांगितले की, ती कोणत्याही धर्मावर विश्वास ठेवत नाही आणि तिने कोणत्याही धर्माचा ठेका घेतला नसल्याचे स्पष्टपणे सांगितले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Election Result: बारामतीचा दादा 'अजितदादा'! लोकसभेला काका, विधानसभेला पुतण्या

Mahrashtra Election Result : हूश्श! अखेर रोहित पवार विजयी झाले

Maharashtra Election Results: अजित पवारांचे शिलेदार चमकले! पाहा दादांच्या राष्ट्रवादीच्या ४१ विजयी आमदारांची संपूर्ण यादी

PM Narendra Modi : 'एक है, तो सेफ है'; महाराष्ट्रातील विधानसभा निकालानंतर PM नरेंद्र मोदींनी पुन्हा दिला नारा

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: महायुतीच्या विजयाचं दिल्लीत सेलिब्रेशन

SCROLL FOR NEXT