Urfi Javed Sam Tv
मनोरंजन बातम्या

Urfi Javed: वाढदिवसाच्या दिवशी उर्फीने दिला चाहत्यांना शॉक, व्हिडीओ पाहून चाहते हैराण

उर्फी जावेदला बर्थडेच्या दिवशी घातलेल्या ड्रेसने झाला त्रास, व्हिडिओ शेअर करत दिली माहिती.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: उर्फी जावेद (Urfi Javed) १५ ऑक्टोबरला २५ वा वाढदिवस (Birthday) साजरा करत आहे. उर्फी तिच्या बर्थडेनिमित्त फॅन्सला स्पेशल ड्रेस घालून सरप्राईज देणार आहे . ती कोणता ड्रेस परिधान करणार आहे हे अजून समजलेले नाही. परंतु तिला या ड्रेसमुळे अनेक जखमा झाल्या आहेत. याविषयी खुद्द उर्फीनेच सांगितले आहे.

उर्फी तिच्या फॅशनमुळे (Fashion) इंडस्ट्रीत प्रसिद्ध आहे. उर्फी नेहमीच तिच्या आऊटफिटवर वेगवेगळे प्रयोग करत असते. कित्येकवेळा हे सर्व प्रयोग अंगलटही आले आहेत. बर्थडेच्या दिवशीही तिच्यासोबत असाच काहीसा प्रकार घडला आहे. उर्फी जावेदने इंस्टाग्रामवर व्हिडिओ शेअर केला असून त्या व्हिडिओमध्ये तिने तिच्या जखमा दाखविल्या आहेत.

उर्फीने व्हिडिओमध्ये सांगितले आहे की, 'Sequin Gloves' घातल्याने तिला ह्या जखमा झाल्या आहेत. बर्थडेच्या वेळी तिने घातलेल्या ड्रेसमुळे तिच्या हाताला आणि पायाला जखमा झाल्या आहेत. जखमा दाखवत तिने त्यामुळे त्रास होत आहे असेही सांगितले आहे. इतका त्रास होत असताना देखील उर्फी आपल्या चाहत्यांसाठी व्हिडिओ शेअर केला आहे.

उर्फी जावेदने बर्थडेच्या आधीच फॅन्सला तिच्या स्पेशल ड्रेसविषयी माहिती दिली होती. उर्फी नेहमीच तिच्या ड्रेसने सर्वांना आश्चर्यचकित करत असते. त्यामुळे बर्थडेच्या दिवशी ती कोणता ब्लास्ट करणार याची आपण कल्पनाच करू शकत नाही. तिचा व्हिडिओ पाहिल्यानंतर सगळ्यांनाच तिचा आऊटफिट बघण्याची उत्सुकता लागली आहे. उर्फी तिच्या बर्थडे ड्रेसने सगळ्यांनाच इम्प्रेस करेल यात शंकाच नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

kiwi Benefits: किवी फळाचे असंख्य फायदे!

VIDEO : पावसात सभा झाल्यावर निवडून येतात; भाषणावेळी पाऊस आला, फडणवीसांचा शरद पवारांना टोला

Champions Trophy: टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानात जाण्यास नकार का दिलाय? समोर आलं खरं कारण

Kalyan News : कल्याण-डोंबिवलीत ४० जण तडीपार; ऐन निवडणुकीत पोलिसांची धडक कारवाई

Electric Vehicle: इलेक्ट्रिक वाहनेच का घ्यावीत, भविष्याच्या दृष्टीने काय आहे फायदा?

SCROLL FOR NEXT