Urfi Javad Saam Tv
मनोरंजन बातम्या

Urfi Javed Controversy: उर्फी जावेद- चित्रा वाघ यांच्या वादाला कायदेशीर वळण, उर्फीची महिला आयोगात तक्रार...

उर्फीने चित्रा वाघ यांच्या विरोधात महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडे रितसर तक्रार अर्ज दाखल केला आहे

सूरज सावंत

Urfi Javed-Chitra Wagh Fight: उर्फी जावेद आणि चित्रा वाघ यांचा वाद वाढतंच चालला आहे. सुरुवातीला सोशल मीडिया होत असलेले आहे युद्ध आता पोलीस ठाण्यापर्यंत पोचले आहे. चित्रा वाघ यांनी केलेल्या तक्रारीमुळे उर्फीला काल मुंबई पोलिसांनी चौकशी साठी बोलावले होते. आज उर्फीने चित्रा वाघ यांच्या विरोधात महिला आयोगाकडे तक्रार केली आहे.

उर्फी आणि तिच्या वकिलांनी दोन दिवसांपूर्वी महाराष्ट्र्र महिला आयोग अध्यक्षा रूपाली चाकणकर यांची भेट घेतली होती. परंतु तेव्हा तिने चित्रा वाघ यांच्या विरोधात कोणतीही तक्रार केली नव्हती. पण आता मात्र उर्फीने महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडे रितसर अर्ज करत तक्रार दाखल केली आहे.

उर्फीने महिला आयोगाकडे केलेल्या तक्रारीमध्ये म्हटले आहे की, मी फॅशन इंडस्ट्रीमधून असल्यामुळे माझं राहणं , माझं दिसणं ही माझ्या व्यवसायाची गरज आहे. चित्रा वाघ यांनी मला मारण्याची धमकी दिली आहे. त्या एका राजकीय पक्षाच्या नेत्या आहेत, त्यामुळे त्यांच्या चिथावणीमुळे माझ्यावर हल्ला होऊ शकतो. त्यामुळे मला असुरक्षित वाटत आहे. माझ्या जीवाला धोका निर्माण झालेला आहे. चित्रा वाघ गेल्या कित्येक दिवसांपासून उघडपणे मारण्याची धमकी देत आहेत. त्यामुळे मला सुरक्षा मिळावी अशी मागणी मी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडे करत आहे.

चित्रा वाघ यांनी मुंबई पोलिसात उर्फी विरोधात तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी चित्रा वाघ यांच्या तक्रारीचे दखल घेत उर्फीला आंबोली पोलीस ठाण्यात चौकशीसाठी बोलावले होते. दरम्यान तिथे तिची ३ तास चौकशी करण्यात आली. त्यानंतर आज उर्फीने चित्रा वाघ यांच्या विरोधात महाराष्ट्र महिला आयोगाकडे रितसर तक्रार दाखल केली आहे.

उर्फी आणि चित्रा वाघ यांच्या हा वाद किती दिवस चालणार आणि त्याचे काय परिणाम होणार हे आपल्याला कळेलच. या सगळ्यात उर्फीने मात्र तिचे काम सुरूचं ठेवले आहे. आज उर्फीने तिचा एक व्हिडिओ तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. तिच्या या व्हिडिओ तुफान प्रतिसाद मिळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मुंबई गोवा महामार्गावर भीषण अपघात

Mumbai School : घोडा, गाडी, पैसे नव्हे चक्क मुंबईत मराठी शाळाच गेली चोरीला, नेमकं प्रकरण आहे तरी काय?

Government Scheme: या सरकारी योजनेत लाडक्या बहिणींना मिळतात २ लाख रुपये; मुख्यमंत्री महिला रोजगार योजना आहे तरी काय?

Matar Usal Recipe : थंडीच्या दिवसांत बनवा गरमागरम 'मटार उसळ', एकदा खाल तर खातच राहाल

Palash Muchhal : स्मृतीचा होणारा नवरा मुंबईत रुग्णालयात दाखल, नेमकं काय घडलं? पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT