Urfi Javed On Her Ranbir Kapoor Statement Instagram
मनोरंजन बातम्या

Urfi Javed Fashion: माझी फॅशनच माझ्या अंगलट येणार? स्वत:नेच व्यक्त केली भिती...

रणबीर कपूरने उर्फीच्या लूकला ‘बॅड टेस्ट’ अशी प्रतिक्रिया दिली होती. तर त्यावर उर्फीने तू काहीही बोललास तरी, माझी फॅशन बदलणार नाही.

Chetan Bodke

Urfi Javed On Her Ranbir Kapoor Statement: उर्फी जावेद नेहमीच आपल्या विचित्र फॅशन सेन्समुळे सर्वत्र चर्चेत असते. उर्फीच्या फॅशन सेन्सची अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी आपली नाराजी दर्शवली होती तर, काहींनी तिची फॅशन देखील करण्याचा प्रयत्न केला. अशातच गेल्या काही दिवसांपूर्वी रणबीरने उर्फीच्या फॅशनवर आपली प्रतिक्रिया दर्शवली. रणबीर कपूरने उर्फीच्या लूकला ‘बॅड टेस्ट’ अशी प्रतिक्रिया दिली होती. तर त्यावर उर्फीने तू काहीही बोललास तरी, माझी फॅशन बदलणार नाही.

गेल्या काही दिवसांपूर्वी, रणबीरने करीना कपूर खानच्या ‘व्हॉट वूमन वॉन्ट’ या शो मध्ये हजेरी लावली होती. त्यावेळी रणबीरने तिच्या फॅशनवर सडकून टिका केली. त्यावर करिनाने उर्फी जावेदच्या फॅशनचे कौतुक केले असून तिला धैर्यवान म्हटले. उर्फी जावेदच्या फॅशनवर करिनाने प्रशंसा केली पाहून उर्फी आनंदित झाली आहे. करिनाने माझे कौतुक केले आहे, हे माझ्यासाठी पुरेसे आहे. रणबीरने आधी स्वत:चे पाहावे. त्याची स्थिती काय आहे? हे आधी पाहावं आणि मग मला बोलावं.

Urfi Javed Post

उर्फीचे हे विधान चर्चेत आले होते आणि त्याची सर्वत्र चर्चा होत होती. आता उर्फी तिच्या विधानावर माघार घेत असल्याचे दिसून आले. याबाबत त्यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

उर्फी जावेदने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत म्हणते, “मी असे कधीच म्हणाले नाही. रणबीरने नरकात जावे अशी मी फक्त गंमत करत होते, आता करिनाने माझे कौतुक केले आहे. मी फक्त गंमतीने म्हणाले होते. रणबीर जे काही बोलला तो त्याचा दृष्टिकोन आहे. मला त्याचे विधान अपमानास्पद वाटले नाही. मी त्याला नरकात जाण्यास सांगितले नाही.”

उर्फी जावेदने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे, त्यात ती म्हणते, “माझ्या विनोदामुळे मला कधीतरी मारहाण होईल. मला माहित आहे, माझ्या कपड्यांमुळे किंवा माझ्या बोलण्यामुळे माझ्या जीवाला धोका आहे.”

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT