Urfi Javed Saam Tv
मनोरंजन बातम्या

Urfi Javed: ट्रोल करणाऱ्याला उर्फी जावेदचे भन्नाट प्रत्युत्तर; कलरफुल दगडांचाच घातला ड्रेस

उर्फी नेहमी तिच्या ड्रेन्सिंग सेन्स आणि हटके स्टाईलमध्ये चर्चेत असते. उर्फीने एक व्हिडीओ शेअर केला आहे. जो पाहून तुम्ही देखील थक्क व्हाल.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: सोशल मीडिया(Social Media) स्टार आणि फॅशननिस्ट उर्फी जावेदने(Urfi Javed) आता तर हद्दच पार केली आहे . उर्फी नेहमी तिच्या ड्रेन्सिंग सेन्स आणि हटके स्टाईलमध्ये चर्चेत असते. नेहमीच नवनवीन प्रयोग करत प्रसिध्दीझोतात राहणाऱ्या उर्फीचा नवीन लूक समोर आला आहे. नुकताच उर्फीने एक व्हिडीओ शेअर केला आहे. जो पाहून तुम्ही देखील थक्क व्हाल.

उर्फी जावेद ही सोशल मीडिया इनफ्ल्युएन्सर आहे. सोशल मीडियावर ती कायम सक्रिय असते. उर्गी नेहमी आपल्या हटके स्टाईलमधले फोटो शेअर करत असते. अनेकदा उर्फी तिच्या अतरंगी फॅशनमुळे चाहत्याचे लक्ष वेधून घेत असते. तिच्या फॅशन सेन्सची चाहत्यांना देखील फार उत्सुकता असते.

आता देखील उर्फिचा एक नवीन लूक समोर आहे. उर्फीच्या या नवीन लूकची तुम्ही कधी कल्पना देखील केली नसेल. उर्फीचा सध्या नवीन लूक तूफान चर्चेत आहे. अनेकवेळा उर्फी तिच्या अतरंगी स्टाईलमुळे ट्रोल देखील झाली आहे. अलीकडेच एका युजरने ट्रोल करत असताना 'हिला दगड फेकून मारला पाहिजे' असे म्हटंले होते. यूजरच्या या कमेंटचे मान ठेवत उर्फीने चक्क रंगीबेरंगी दगडाचाच ड्रेस परिधान केला आहे.

उर्फी जावेदने तिच्या इन्स्टाग्राम हॅडलवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. फॅशननिस्टा उर्फीने कलरफुल स्टोनची बिकनी परिधान केली आहे. उर्फीने हा व्हिडीओ शेअर करत " होय! एका यूजरच्या या कमेंटने मला हे करायला भाग पाडले आहे, माझ्यावर आरोप लावू नका, त्या कमेंटवर बोला." असे म्हटंले आहे.

उर्फी जावेद ही फॅशन आयकॉन म्हणून देखील ओळखली जाते. अनेकदा उर्फी तिच्या अतरंगी फोटोमुळे चर्चेत असते. उर्फीच्या कलरफुल स्टोनच्या या ड्रेसमधल्या व्हिडीओला काही मिनीटातंच लाखोंच्या घरात लाईक्स आणि कमेंट्स आल्या आहेत. उर्फीच्या एका चाहत्याने वाह! असे लिहिले आहे. तर आणखी एकाने, मला तुमची ही स्टाईल आवडली आहे. तर काहीनी तिला टोला देखील लगावला आहे. एका यूजरने, तिला यातला एक स्टोन पडला तर? असा थेट प्रश्न केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rain Alert : पुढील ८ ते ४८ तासांत कोकण-गोव्यासह १९ राज्यांत वादळी वाऱ्यांसह पाऊस कोसळणार, हवामान खात्याचा अलर्ट

Mens Health : पुरुषांच्या लघवीतून रक्त येणे हे गंभीर आजाराचे लक्षण आहे? वेळीच व्हा सावध अन्यथा...

Maharashtra News Live Update: नीट पेपरप्रकरणी पुण्यात विद्यार्थ्यांचा आक्रोश मोर्चा

जयश्री नागे आत्महत्या प्रकरणात ट्विस्ट; नवऱ्याला ७ वर्षांचा तुरुंगवास, सासरच्या मंडळीची निर्दोष मुक्तता, कोर्टात नेमकं काय घडलं?

तस्करांचा माल सोडण्यास नकार; DRIच्या वरिष्ठ अधिकाऱ्याला थेट 'दाऊद गँग'च्या नावाने धमकी, मोठी खळबळ

SCROLL FOR NEXT