Nitin Desai Death
Nitin Desai Death Saam Tv
मनोरंजन बातम्या

Nitin Desai Death Case: नितीन देसाई यांनी टोकाचं पाऊल का उचललं? स्थानिक आमदारांनी सांगितलं एक-दीड महिन्यापूर्वी झालं होतं बोलणं...

Priya More

Mumbai News: मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीचे सुप्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई (Marathi Director Nitin Desai ) यांनी आत्महत्या केली आहे. कर्जतच्या एन.डी स्टुडिओमध्ये त्यांनी गळफास लावून आत्महत्या (Nitin Desai Death Case) केली. त्यांच्या आत्महत्येमुळे एकच खळबळ उडाली आहे. नितीन देसाई यांनी आर्थिक विवंचनेतून आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं असल्याचे सांगितले जात आहे. रायगडचे आमदार महेश बालदी (MLA Mahesh Baladi) यांनी माध्यमांशी संवाद साधताना ही माहिती दिली.

रायगड जिल्ह्यातल्या उरण विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश बालदी यांनी नितीन देसाई यांच्या आत्महत्येनंतर दु:ख व्यक्त केले आहे. त्यांनी सांगितले की, 'एक चांगला कलादिग्दर्शक गेला याचे दु:ख आहे. आमच्या विभागात त्यांचा एनडी स्टुडिओ आहे. त्याठिकाणी स्थानिकांना रोजगार देण्यामध्ये त्यांचा पुढाकार होता. आमच्यासाठी ते एक अभिमानाचं पान होतं की, एनडी स्टुडिओ हा आमच्या विभागामध्ये आहे. अनेक चांगल्या चांगल्या फिल्म्स त्याठिकाणी झाल्या आणि नितीन देसाईंची कलात्मकता ही संपूर्ण जगाने पाहिली आहे. त्यामुळे असा कलाकार गेल्याचे निश्चित दु:ख मला आहे.'

तसंच, 'आर्थिक विवंचनेमुळे आत्महत्या केली असावी असा प्राथमिक अंदाज आहे. एक-दीड महिन्यापूर्वी जेव्हा आमची भेट झाली होती तेव्हा स्टुडिओमुळं ते आर्थिक विवंचनेत होते, असं त्यांनी मला सांगितलं होतं. आज सकाळी चार वाजता त्यांनी आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे. आमचे तिथले प्रमुख कार्यकर्त सुधीर ठोंबरे यांनी मला सकाळी साडेआठ वाजता याची फोनवरुन माहिती दिली.'

'आपले चित्रपट चालत नाहीत. नवीन येणाऱ्या चित्रपटांबद्दल आणि त्याच्यावर काम सुरु असल्याचे देखील नितीन देसाई यांनी सांगितलं होतं. एक दीड वर्षांपासून त्यांचा कुठला सिनेमा चांगला चाललेला नाही. ते काही टीव्ही मालिकांवर देखील काम करत होते. पण त्यातून त्यांची आर्थिक गाडी रुळावर येत नसल्याची स्थिती होती. त्यामुळं आजचा हा दुःखद दिवस आपल्याला दिसला आहे.', असं देखील महेश बालदी यांनी सांगितले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Special Report: तुळजाभवानी देवीला चॉकलेटचा हार, देवीच्या भक्तांमध्ये संतापाची लाट!

Assembly Election: विधानसभेसाठी काँग्रेस लागली कामाला, 288 जागांवर चाचपणी सुरू; ठाकरे-पवारांचं टेंशन वाढणार?

Special Report: Team India: क्रिकेटपटूंवर कोट्यावधींची उधळण!

Rasin Benefits: रिकाम्या पोटी मनुक्याचे पाणी प्यायल्यावर काय होते ? जाणून घ्या

Rohit Sharma-Virat Kohli : रोहित, विराट तुमचा निर्णय मागे घ्या; विश्वविजेत्या संघाचा दारुण पराभव होताच चाहत्यांना झाली 'रो-को'ची आठवण

SCROLL FOR NEXT