Untavarche Shahane Marathi Movie Saam Tv
मनोरंजन बातम्या

Untavarche Shahane: जगाकडे पाहण्याचा मिश्किल दृष्टिकोन; ‘उंटावरचे शहाणे’ चित्रपटाचा भव्य मुहूर्त सोहळा संपन्न!

Untavarche Shahane Marathi Movie: ‘उंटावरचे शहाणे’ या मराठी म्हणीला एका वेगळ्या ढंगात विनोदी स्वरूप देणारा ‘उंटावरचे शहाणे’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

Shruti Vilas Kadam

Untavarche Shahane Marathi Movie: मराठीत अनेक अर्थपूर्ण म्हणी आहेत, पण ‘उंटावरचा शहाणा’ म्हणीला एका वेगळ्या ढंगात विनोदी स्वरूप देणारा ‘उंटावरचे शहाणे’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सौम्या प्रोडक्शनच्या निर्मितीखाली तयार होणाऱ्या या चित्रपटाच्या चित्रीकरणाचा शुभारंभ ६ मार्च २०२५ रोजी दिमाखदार सोहळ्यात पार पडला.

चित्रपटाचे निर्माते प्रशांत अनिल गवळी, दिग्दर्शक शुभम सुनील दळवी, छायाचित्रकार के. विजय, कार्यकारी निर्माता विष्णु घोरपडे, आणि लाइन प्रोड्यूसर बजरंग मासाळ यांच्या उपस्थितीत मुहूर्ताचा सोहळा संपन्न झाला. चित्रपटाच्या शीर्षकाप्रमाणेच हा एक हलकाफुलका, विनोदी आणि मनोरंजनाने भरलेला प्रवास असणार आहे.

‘उंटावरचा शहाणा’ ही मराठी म्हण आपल्या अवतीभोवती घडणाऱ्या विसंगत आणि गंमतीशीर प्रसंगांवर मार्मिक भाष्य करणारी आहे. आणि हाच पैलू या चित्रपटात मनोरंजक पद्धतीने दाखवला जाणार आहे. समाजातील गमतीशीर आणि विसंगत गोष्टींवर हास्याचा चपखल तडका देत हा सिनेमा प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करणार आहे.

"‘उंटावरचे शहाणे’ हा केवळ विनोदी चित्रपट नसून, तो आपल्या भोवतालच्या जगाकडे मिश्किल नजरेने पाहण्याचा एक वेगळा दृष्टीकोन देईल. प्रेक्षकांना हलकं-फुलकं आणि ताजेतवाने करणारे मनोरंजन देण्याचा आमचा प्रयत्न असेल. या सिनेमाच्या माध्यमातून समाजातील काही विसंगतींवर हसत-हसत भाष्य करताना, त्यातून एक महत्त्वाचा संदेशही देण्याचा आमचा मानस आहे." असे दिग्दर्शक शुभम सुनील दळवी म्हणाले.

चित्रपटाच्या टीमकडून लवकरच कलाकारांच्या नावांची घोषणा करण्यात येणार आहे. या अनोख्या संकल्पनेवर आधारित चित्रपटाविषयी उत्सुकता वाढली असून प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vasai-Virar Politics: वसई-विरारचा 'गड' राखण्यासाठी ठाकूर-गावडे युती, भाजपच्या 'चक्रव्यूह' भेदणार का?

Firing In America: अमेरिकेतील मिसिसिपीमध्ये अंदाधुंद गोळीबार; ६ जणांचा मृत्यू

उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; माजी आमदार शिंदेसेनेत प्रवेश करणार

Maharashtra Live News Update: पालघर जिल्ह्यात पुन्हा भूकंपाचे सौम्य धक्के

Maharashtra Politics: राजकीय मंचावर ताई-दादा एकत्र; निवडणुकीनंतरही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र राहणार?

SCROLL FOR NEXT