Tejaswini Pandit Post Saam Tv
मनोरंजन बातम्या

Tejaswini Pandit Post: माझं तुझ्यावर प्रियापेक्षा थोडं...; तेजस्वीनी पंडितच्या उमेशला वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा, पोस्ट चर्चेत

Tejaswini Pandit Wish Umesh Kamat: नाटक, मालिका आणि चित्रपट अशा सर्व माध्यमातून आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकणार अभिनेता म्हणजे उमेश कामत. उमेश आज त्याचा ४४ वा वाढदिवस साजरा करत आहे. उमेशची खास मैत्रिण तेजस्वीनी पंडितनेही उमेशला हटके शुभेच्छा दिल्या आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Umesh Kamat Birthday:

नाटक, मालिका आणि चित्रपट अशा सर्व माध्यमातून आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकणार अभिनेता म्हणजे उमेश कामत. उमेश आज त्याचा ४४ वा वाढदिवस साजरा करत आहे. उमेशच्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांनी त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. इंडस्ट्रीतील कलाकारांनी उमेशला शुभेच्छा दिल्या आहे. उमेशची खास मैत्रिण तेजस्वीनी पंडितनेही उमेशला हटके शुभेच्छा दिल्या आहेत.

तेजस्वीनीने उमेशसाठी इन्स्टाग्राम अकाउंटवर स्टोरी शेअर केली आहे. तेजस्वीनीने उमेशसोबतचा एक सेल्फी शेअर करत माझं तुझ्यावर प्रियापेक्षा थोडं कमी प्रेम आहे... खूप प्रेम मित्रा असं कॅप्शन देत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहे. तेजस्वीनीच्या या हटके शुभेच्छा सध्या चर्चेत आहेत.

तेजस्वीनी आणि उमेश कामतची मैत्री सर्वांनाच माहित आहे. या दोघांनी अनेक चित्रपटात एकमेकांसोबत काम केले आहे. त्यांच्या जोडीचे काम नेहमीच चाहत्यांना आवडते.

Umesh Kamat

उमेशच्या वाढदिवसानिमित्त इंडस्ट्रीतून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. उमेशची बायको प्रियानेदेखील उमेशला हटके अंदाजात शुभेच्छा दिल्या आहेत. प्रियाने उमेश आणि कुटुंबियांचे फोटो शेअर करत 'माझा लाडका उमेश, माझ्या आयुष्यात तुझं असणं हे माझं सर्वात मोठं भाग्य आहे. 'तू माझ्या प्रत्येक क्राइममधील पार्टनर, मला कसं चिडवायचं आणि माझ्यावर कसं प्रेम करायचं हे ज्याला माहित आहे! अशा गोड, त्रासदायक आणि अमर्याद प्रेमाला शुभेच्छा. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा'असं कॅप्शन दिले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सोन्याच्या दागिन्यांचा मोह आवरला नाही आणि दोन अल्पवयीन मुलांनी केला 80 वर्षीय वृध्देचा खुन

Maharashtra Tourism: ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा, कोल्हापूरातील 'ही' सुंदर ठिकाणं पाहिलीत का?

Tringalwadi Killa : ऐतिहासिक ठिकाणी फिरायला जायचंय? त्रिंगलवाडी किल्ला ठरेल बेस्ट

Karishma Kapoor: ५१ वर्षांच्या करिश्माचा काय आहे स्किन केअर सिक्रेट; जाणून घ्या

Maharashtra Politics : शिंदे गटाला भाजपकडून धक्का! शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसह अनेक कार्यकर्त्यांनी हाती घेतलं 'कमळ'

SCROLL FOR NEXT