मध्यप्रदेशातील उज्जैनमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. सोशल मीडियावरील व्हिडीओवर येणाऱ्या कमेंटला कंटाळून एका १६ वर्षीय सोशल मीडिया एन्फ्लूएंसरने आत्महत्या करत आपले जीवन संपवले आहे. ही घटना २१ नोव्हेंबरला घडलीये. त्याने राहत्या घरी गळफास घेत आपले जीवन संपवले आहे. घरामध्ये कोणीही नव्हते त्यावेळी त्याने हे टोकाचं पाऊल उचललं आहे. (Social Media)
नागझिरी पोलीस स्टेशनमधून मिळालेल्या माहितीनुसार, अद्याप हत्येमागील कारण अस्पष्ट आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास अधिक सखोल करत आहे. सोशल मीडिया एन्फ्लूएंसरबाबत त्याच्या वडीलांसह, शेजारी राहणाऱ्या लोकांचा पोलिसांनी जबाब नोंदवून घेतला आहे. पोलिसांनी त्याचा मोबाईल जप्त केला असून त्याचे सोशल मीडिया अकाऊंट तपासून विविध माहिती गोळा केली जात आहे. (Madhya Pradesh News)
नेमकं काय घडलं?
त्याने दिवाळीमध्ये, इन्स्टाग्रामवर एक रिल शेअर केली होती. शेअर केलेल्या रिलमध्ये, त्या एन्फ्लूएंसरने मेकअप करुन साडी परिधान केलेली दिसत आहे. त्या व्हिडीओमध्ये त्याने अगदीच मुलींसारखे हावभाव दिलेली दिसत आहे. (Trolled)
याच व्हिडीओवरुन त्याला प्रचंड ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. नेमकी त्याने आत्महत्या का केली? त्याच्या हत्येमागील मुख्य कारण काय? याबद्दलची माहिती पोलिसांना मिळालेली नाही. सध्या पोलीस त्याच्या आत्महत्येचा अधिकाधिक तपास करत आहे. (Entertainment News)
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.