उर्फी जावेद नावं जरी घेतलं तरी तिच्या विविध आऊटफिट्सची चर्चा होत असते. उर्फी कधी कोणती गोष्ट कपडे म्हणून परिधान करेल याचा कोणीही अंदाज लावू शकत नाही. नुकतंच उर्फीन हटके अन् तितकाच आकर्षक असा आऊटफिट तयार केला आहे. सध्या सोशल मीडियावर तिच्या या स्टाईलचीच चर्चा आहे.
नेटकऱ्यांना कायमच बुचकळ्यात पाडणारी उर्फी आतादेखील अनोख्या अंदाजाने भेटीला आली आहे. उर्फीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर व्हिडीओ शेअर केली आहे.ज्यामध्ये तिने, बोल्टनट आणि मोबाईल फोनच्या सहाय्याने हटके पोशाख केला आहे. उर्फीच्या अतरंगी स्टाईलने सर्वांनाच थक्क केले आहे. आयफोन तसेच विविध टॉपमॉडेल्सचा उपयोग उर्फीने तिचे कपडे म्हणून केलेला पाहायला मिळतो.
सोशल मीडियावर उर्फीचा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत असून नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा चांगलाच वर्षाव सुरू आहे. एकाने, नवीन देखावा मच्छरदाणी असं म्हटलं आहे. तर आणखी एकाने, डॉक्टरांनी काय सांगितले, कधी बरे होणार? मात्र असे असले तरी उर्फी कधीही यामध्ये बदल करताना दिसत नाही. तर उर्फीने यापेक्षा आणखी काय हटके होईल याचाच विचार करते. सोशल मीडियावर उर्फीचा मोठा चाहतावर्ग आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.