बॉलीवुडचे दिग्गज अभिनेते ऋषि कपूर आज आपल्यासोबत नसले तरी त्यांच्या अनेक आठवणी किस्से आजही फिल्म इंडस्ट्रीमध्ये जिवंत आहेत. त्यांच्या बेधडक बोलण्यामुळे ते नेहमीच चर्चेत राहायचे. नुकताच सोशल मीडियावर त्यांच्या काजोल आणि ट्विंकल खन्ना यांच्या 'टू मच विथ काजोल अँड ट्विंकल' या शोमध्ये ऋषी कपूर यांचा पुन्हा एकदा उल्लेख झाला. या शोमध्ये ट्विंकल, आलिया भट्ट आणि वरुण धवन यांनी ऋषी कपूर यांच्या आठवणीत काही मजेशीर किस्से सांगितले.
शोमध्ये ट्विंकल खन्नाने एक मजेदार किस्सा सांगितला. तिने खुलासा केला की एकदा ऋषी कपूर यांनी तिच्या वाढदिवसाच्या दिवशी ट्विट करत म्हटलं होतं, ''जेव्हा तू तुझ्या आईच्या पोटात होतीस, तेव्हा मी तिच्यासाठी गाणी गायली.'' या ट्विटनंतर सोशल मीडियावर प्रचंड चर्चा सुरु झाली. पुढे लोकांनी ट्विंकलला ऋषी कपूरची 'नाजायज मुलगी' म्हणायला सुरुवात केली. ट्विंकल म्हणाली, 'यानंतर ऋषी जींना सोशल मीडियावर ट्रोल केलं गेलं आणि त्यांनी माफी मागत स्पष्ट केलं की हे फक्त विनोदाने म्हटलेलं होतं.'' या किस्स्यादरम्यान आलिया थोडी अस्वस्थ दिसली.
काजोल तिच्या चेहऱ्यावरील हावभावांकडे बघत म्हणाली, ''आलियाचा चेहरा बघा, काय प्रतिक्रिया द्यावी समजत नाही.'' त्यावर ट्विंकलने हसत उत्तर दिलं, ''मी तुझी नणंद नाही, हा फक्त गैरसमज होता.'' वरुण धवननेही ऋषी कपूर यांच्यासोबतचा एक मजेशीर प्रसंग सांगितला. त्याने सांगितलं की 'स्टुडंट ऑफ द इयर'च्या फुटबॉल सीनदरम्यान ऋषी कपूर यांना त्याच्या आणि सिद्धार्थ मल्होत्राच्या केसांमध्ये लावलेल्या जेलमुळे त्रास झाला होता.
ऋषी कपूर म्हणाले, तुझे केस हलतच नाहीत. मी शॉट देणार नाही. त्यांनी डायरेक्टर करण जोहरला बोलावून सांगितलं, याच्या केसांचं संपूर्ण जेल काढून टाका आणि केस हवेत उडू द्या. हा किस्सा ऐकून सर्वजण पोट धरुन हसू लागले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.