Taarak Mehta Ka Ooltah Chashmah Saam Tv
मनोरंजन बातम्या

Tappu Is Back In TMKOC: 'तारक मेहता का उलटा चश्मा'मध्ये टपूची ग्रँड एन्ट्री; 'हा' अभिनेता साकारतोय महत्त्वाची भुमिका

'तारक मेहता का उलटा चश्मा'च्या प्रेक्षकांसाठी एक आनंदाची बातमी आहे.

Pooja Dange

'तारक मेहता का उलटा चश्मा' ही मालिका गेली अनेक वर्ष प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेने अनेक चढ-उतार पहिले आहेत. अनेक कलाकार ही मालिका सोडून गेले आहेत. परंतु या मालिकेवरील प्रेक्षकांचे प्रेम कमी झालेले नाही.

'तारक मेहता का उलटा चश्मा' या मालिकेतील दोन पात्र प्रेक्षकांची खूप लाडकी आहेत. त्यांना पाहण्यासाठी बऱ्याच दिवसांपासून प्रेक्षक आतुर आहेत. तसेच सतत निर्मात्यांकडे त्यांना परत आणण्याची मागणी करत आहेत. ही पात्र म्हणजे दयाबेन आणि टपू.

'तारक मेहता का उलटा चश्मा'च्या प्रेक्षकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मालिकेत टपूची पुन्हा एन्ट्री झाली आहे. कालच्या भागात टपूला मालिकेत दाखविण्यात आले. टपूने मालिकेत ग्रँड एन्ट्री घेतली.

गोकुळधाममधील नागरिकांसाठी हा एक धक्का होता. कारण टपूच्या येण्याआधी तसे भयंकर वातावरण तयार करण्यात आले होते. सर्व गोकुळधाम वासियांच्या घरी निनावी गिफ्ट पाठविण्यात अली होती. मध्यरात्री आलेल्या या निनावी भेटवस्तूंमुळे सर्वच घाबरले होते आणि कंपाउंडमध्ये जमा झाले होते. त्यानंतर लाल रंगाचा मास्क लावून आलेला टपू सर्वाना आश्चर्याचा धक्का देतो.

टपूला पाहून सगळेजण त्यांना झालेला त्रास विसरून जातात. भिडे आणि अय्यर मात्र यावरून जेठालाल ओरडतात. तसेच टपूला देखील बोलतात. पण सगळेजण त्यांची समजूत काढतात. त्यावर टपू त्याची बाजू समजावून सांगतो.

'तारक मेहता का उलटा चश्मा'मध्ये आधी टपू हे भव्य गांधी साकारत होता. राज अनादकट याने हे पात्र काही काल साकारले होते. आता नितीश भुलानी हे पात्र साकारणार आहे. प्रेक्षक त्याला किती प्रेम देतात हे येणाऱ्या काळात कळेल.

टपू नंतर आता प्रेक्षकांना दयाबेन कधी येणार असे झाले असेल. निर्माते तिच्या शोधात आहेत. दिशा वकानीला आणण्याचे किंवा तिच्या बदल्यात दुसऱ्या अभिनेत्रीला मालिकेत घेण्याच्या प्रयत्नात 'तारक मेहता का उलटा चश्मा'चे निर्माते आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Protein Breakfast Recipe: सतत भूक लागतेय? मग नाश्त्यात करा या 4 पदार्थांचा समावेश, सततची भूक होईल गायब

Zilla Parishad Election Result 2026 LIVE Updates : लातूरमध्ये काँग्रेसला धक्का, भाजप-शिंदेंच्या शिवसेनेकडे आघाडी

ZP Election Result: कोल्हापुरात सतेज पाटलांना धक्का, महिला कार्यकर्त्यांनी केळी दाखवून डिवचलं

Famous Actors: अभिनेता विशाल अन् अक्षयाचे सुंदर फोटो सोशल मीडियावर व्हायरल

Womens Hairstyles: महिलांसाठी 5 ट्रेंडी हेअरकट, प्रत्येक लूकवर शोभून दिसतील

SCROLL FOR NEXT