tunisha Sharma Saamtv
मनोरंजन बातम्या

Tunisha Sharma Death: टुनिशा शर्मा ठरली लव्ह जिहादचा बळी? पोलिसांनी स्पष्टच सांगितले; अभिनेत्रीच्या प्रेग्रेंसीबद्दलही मोठा खुलासा

आत्महत्या प्रकरणात लव जिहादचा ऍंगल समोर आल्यास त्याची सखोल चौकशी केली जाईल तसेच अभिनेत्रीच्या कुटूंबियांना न्याय दिला जाईल असे आश्वासन भाजपा आमदार राम कदम यांनी दिले होते.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Tunisha Sharma: लोकप्रिय टेलिव्हिजन अभिनेत्री टुनिशा शर्माच्या आत्महत्येने मनोरंजन जगतात खळबळ माजली आहे. या वीस वर्षीय अभिनेत्रीने चालू मालिकेच्या शुटिंग सेटवर गळफास घेत आत्महत्या केली. या प्रकरणात आता नवनवीन खुलासे होताना दिसत आहेत.

अभिनेत्रीच्या आत्महत्या प्रकरणात समोर आलेल्या माहितीनुसार , मुंबई पोलिस (Mumbai Police) अधिक्षक चंद्रकांत जाधव यांनी पत्रकार परिषद घेत या प्रकरणातील महत्वाचा खुलासा केला आहे.

टुनिशा शर्मा आत्महत्या प्रकरणाने सध्या देशभरात खळबळ उडाली आहे. अवघ्या वीस वर्षीय टुनिशा शर्माने मालिकेच्या सेटवर गळफाळ घेत आत्महत्या केली. या संपूर्ण प्रकरणावर पोलिसांनी पत्रकार परिषद घेत महत्वाचे खुलासे केले आहेत. ज्यामध्ये त्यांनी टुनिशा आणि शीझान दोघेही रिलेशनमध्ये होते, पाच दिवसांपूर्वीच त्यांचे ब्रेकअप झाल्याने अभिनेत्री डिप्रेशनमध्ये होती, हेच तिच्या आत्महत्येचे कारण होते असा खुलासा केला.

या आत्महत्या प्रकरणात लव जिहादचा ऍंगल समोर आल्यास त्याची सखोल चौकशी केली जाईल तसेच अभिनेत्रीच्या कुटूंबियांना न्याय दिला जाईल असे आश्वासन भाजपा (BJP) आमदार राम कदम यांनी दिले होते. यावरही पोलिसांनी स्पष्टिकरण दिले आहे.

पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, "मीरा रोड येथील रहिवासी विनिता शर्मा यांची मुलगी टुनिशा शीजान खानसोबत अली बाबा: दास्तान-ए-गालिब या मालिकेत काम करत होती. या प्रकरणात अफेअर, ब्लॅकमेलिंग किंवा 'लव्ह जिहाद'चा कोणताही ऍंगल आतापर्यंत समोर आलेला नाही. तुनिशा आणि शीजान या दोघांचे मोबाईल जप्त करण्यात आले असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे."

दरम्यान यावेळी पोलिस अधिक्षक जाधव यांनी टुनिशाने ब्रेकअपमुळे आत्महत्या केली. शीझान माझ्याशी बोलत नसल्याचे तिने आईलाही आईला सांगितले होते, त्यामुळेच ती डिप्रेशनमध्ये होती असे ते म्हणाले. त्याचबरोबर अभिनेत्री प्रेग्रेंट असल्याची बाबही समोर आली नसल्याचा खुलासा त्यांनी यावेळी केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Weekly Horoscope: या राशींच्या व्यक्तींनी आरोग्याची काळजी घ्यावी, जाणून घ्या राशीभविष्य

High Blood Pressure: रोजच्या धावपळीत ताण-थकवा येतोय; दुर्लक्ष करणं पडेल महागात, BPसोबत वाढतील 'या' समस्या

Maharashtra Live News Update : राज ठाकरे उद्या पुणे दौऱ्यावर

पुण्यात गुन्हेगारांना तिकिट देणं आवडलं नाही, फडणवीसांनी अजित पवारांना सुनावले

Mahhi Vij : "तुम लोगों पर थूकती हूं..."; घटस्फोटानंतर माहीचे मित्रासोबत जोडलं नाव, संतापलेल्या अभिनेत्रीनं VIDEO केला शेअर

SCROLL FOR NEXT