Shrenu And Akshay Wedding Saam Tv
मनोरंजन बातम्या

Shrenu And Akshay Wedding: श्रेनु पारिख आणि अक्षय म्हात्रेचा धुमधडाक्यात पार पडला विवाहसोहळा, लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल

Shrenu And Akshay Marriage: 'इश्कबाज' या मालिकेमध्ये श्रेनुने गौरीची भूमिका साकारली होती. या मालिकेमुळे श्रेनु घराघरामध्ये पोहचली. अक्षय देखील प्रसिद्ध टीव्ही अभिनेता आहे. मालिकेच्या सेटवरच दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले आणि त्यांनी एकमेकांना आयुष्याचा जोडीदार म्हणून निवड केली.

Priya More

Shrenu Parikh And Akshay Mhatre:

हिंदी टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री श्रेनु पारिख (shrenu parikh) नुकताच विवाहबंधनात अडकली. श्रेनु पारिखने तिचा बेटरहाफ अक्षय म्हात्रेसोबत (akshay mhatre) २१ डिसेंबर २०२३ ला लग्न केले. 'इश्कबाज' या मालिकेमध्ये श्रेनुने गौरीची भूमिका साकारली होती. या मालिकेमुळे श्रेनु घराघरामध्ये पोहचली. अक्षय देखील प्रसिद्ध टीव्ही अभिनेता आहे. मालिकेच्या सेटवरच दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले आणि त्यांनी एकमेकांना आयुष्याचा जोडीदार म्हणून निवड केली. अक्षय आणि श्रेनुच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या दोघांवर देखील त्यांच्या चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

अभिनेत्री श्रेनु पारीख आणि अक्षय म्हात्रे यांनी आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर लग्नातील सुंदर क्षणांचे फोटो शेअर केले आहेत. शाही थाटामध्ये त्यांचा विवाहसोहळा धुमधडाक्यात पार पडला. या लग्नसोहळ्याला श्रेनु आणि अक्षयच्या कुटुंबातील सदस्य, मित्र परिवार आणि जवळचे नातेवाईक उपस्थित होते. दोघांनी देखील लग्नाचे फोटो इन्स्टावर शेअर करत कॅप्शनमध्ये 'टेकन फॉरेव्हर' असे लिहिले आहे. त्यासोबत या पोस्टमध्ये त्यांनी लग्नाची तारीख देखील टाकली आहे.

लग्नामध्ये श्रेनु आणि अक्षय दोघेही खूपच क्यूट दिसत होते. श्रेनू लाल रंगाचा हिरेजडीत लेहेंगा परिधान केला होता. नववधूच्या रुपामध्ये ती खूपच सुंदर दिसत होती. तर अक्षयने श्रेनूच्या लेहेंग्याच्या कलरची शेरवानी परिधान केली होती. यामध्ये तो खूपच हॅण्डसम दिसत होता. सोशल मीडियावर श्रेनुचा लग्नातील एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये लग्नात एन्ट्री करताना श्रेनु भावुक झाल्याचे दिसत होती. पारंपारिक गुजराती पद्धतीने त्याचा विवाहसोहळा पार पडला.

तर अक्षय म्हात्रेचा देखील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये लग्नाच्या ठिकाणी नवरदेवाची जबरदस्त एन्ट्री होते. पांढऱ्या फुलांनी सजवलेल्या कारमध्ये उभा राहून अक्षय डान्स करत लग्नाच्या ठिकाणी एन्ट्री करतो. 'बचना ए हसीनो' या गाण्यावर डान्स करत तो आपल्या नवरीला घ्यायला येतो. यावेळी अक्षयच्या वरातीमध्ये त्याचे कुटुंबीय आणि मित्र मनसोक्त डान्स करतात. सध्या अक्षय आणि श्रेनूच्या लग्नाच्या व्हिडीओ आणि फोटोंना चाहत्यांनी चांगली पसंती दिली आहे. दोघांचेही चाहते आणि सेलिब्रिटी त्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: डोंबिवली रेल्वे स्टेशनवर एकादशी वारीचा पारंपरिक गजर

दारु पिऊन शिक्षकाचा शाळेतच विद्यार्थ्यांसोबत डान्स; व्हिडिओ पाहून राग अनावर होईल

Shirdi Sai Temple: विठू माऊली तू, माऊली जगाची...; आषाढीचा उत्साह शिर्डीत, फुलांनी सजले साई मंदिर

Thackeray Brothers : ठाकरेंच्या लढ्याला दक्षिणेचा पाठिंबा, थेट मुख्यमंत्र्यांनी केलं कौतुक, म्हणाले प्रेरणादायी...

Karjat Tourism : हिरव्यागार जंगलात लपलेला सुंदर धबधबा, पावसाळ्यात वीकेंड येथेच प्लान करा

SCROLL FOR NEXT