Vibhuti Thakur Saam Tv
मनोरंजन बातम्या

टीव्ही अभिनेत्रीचा फोन नंबर लीक! विकृतांनी अश्लील कॉल, मेसेज करत केली शरीर सुखाची मागणी

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

समाजात आजकाल ऑनलाइन आर्थिक फसवणूक तसेच समाजमाध्यमांद्वारे लैंगिक छळाच्या घटना वाढत आहेत. छोट्या पडद्यावरील तेरा यार हूं मैं सीरियल फेम विभूती ठाकूर ही सायबर क्राइमची शिकार झाली आहे. काही दिवसांपूर्वी तिचा नंबर सोशल मिडिआवर लीक झाला होता. त्यानंतर काही लोकांनी तिच्याकडे शरीर सुखाची मागणी केली. हा धक्कादायक प्रकार समोर आल्यांनतर संपूर्ण प्रकरणावर भावुक होत तिने यावर भाष्य केले आहे.

‘तेरा यार हू मै’ या मालिकेतील अभिनेत्री विभूती ठाकूर ही सायबर बुलिंगची शिकार ठरली आहे. नुकतेच एका मुलाखतीत विभूतीने या संपूर्ण प्रकरणावर भाष्य केले आहे. ती म्हणाली, हे सर्व कसे घडले? नेमके काय झाले? याबाबत मला अजिबात माहिती नाही. तसेच हा नंबर कोणी लीक केला? याचीही मला माहिती नाही. पण हे सर्व फार वाईट आहे, असे म्हणत विभूती भावूक झाली.

तसेच याबद्दल तिने आपल्या इंस्टाग्रामवर देखील एक संदेश लिहिला आहे, विभूतीने लिहिले की, तिला मेसेज आणि कॉल येत आहेत, त्यामुळे तिने असे कृत्य करणाऱ्या इन्स्टा पेजविरुद्ध तक्रार करण्याचा निर्णय घेतला आहे. तिला मेसेज करणाऱ्या सर्व क्रमांकांवर कारवाई करण्यात येईल, असेही तिने लिहिले आहे. ते पेज शेअर करून तिने प्रत्येकाला या खात्याबाबत तक्रार करण्याची विनंती केली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : महायुतीसाठी २०९ जागांवर अनुकूल वातावरण, शिवसेनेच्या सर्व्हेक्षणातून दावा

Maharashtra Weather: गणेश विसर्जनानंतर राज्यात पावसाची एन्ट्री! आज 'या' भागात बरसणार, हवामान खात्याचा अंदाज; वाचा सविस्तर...

Today Horoscope : जुना अबोला मिटेल,घरात उत्साहाचे वातावरण राहील; वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today : आज विनाकारण शत्रुत्व ओढवून घ्याल, दानधर्मासाठी खर्च कराल; वाचा तुमच्या नशिबात आज काय लिहिलंय?

Fact Check : गणपतीसारख्या दिसणाऱ्या बाळाचा जन्म? काय आहे व्हायरल व्हिडिओमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT