Divyanka Tripathi Divyanka Tripathi
मनोरंजन बातम्या

Divyanka Tripathi: टीव्ही अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठीची इटलीत लुटमार; कार फोडून चोरांनी पळवलं पासपोर्ट, क्रेडिट कार्ड

Divyanka Tripathi: टेलिव्हिजन अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठीबाबत एक धक्कादायक बातमी समोर आलीय. तिच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त अभिनेत्री पती विवेक दहियासोबत इटलीला गेली होती. मात्र तेथे त्यांची लूट झाली.

Bharat Jadhav

टेलिव्हिजन अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठींच्या चाहत्यांसाठी एक चिंता वाढवणारी बातमी समोर आलीय. दिव्यांका लग्नाच्या वाढदिवसानिमित्त अभिनेत्री पती विवेक दहियासोबत इटलीला गेली होती. मात्र तेथे त्यांची लूटमार झालीय. विशेष म्हणजे त्यांना तेथे पोलिासांकडून कोणतीच मदत मिळाली नाहीये. दिव्यांका आणि विवेकसोबत युरोपमध्ये काय घडले हे समजल्यानंतर त्यांचे चाहते नाराज झालेत.

या संपूर्ण घटनेबद्दल विवेकने माहिती दिलीय. आमची ट्रिप खूप छान चालली होती. काल आम्ही फ्लॉरेन्सला राहायला आलो. आम्ही ज्या हॉटेलमध्ये राहणार होतो ते बघायला गेलो होतो. यावेळी आम्ही आमचे सामान पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या कारमध्ये ठेवले होतं. आम्ही आमचे सामान घेण्यासाठी परत कारकडे आलो तेव्हा सर्व सामान चोरीला गेले होते. आमचे पासपोर्ट, पर्स आणि १० लाख रुपयांच्या मौल्यवान वस्तू चोरीला गेल्या होत्या.

चोरट्यांनी कारच्या काचा फोडून आत प्रवेश केला. आत ठेवलेले साहित्य घेऊन पळ काढला. 'आम्ही स्थानिक पोलिसांना मदतीची विनंती केली, पण त्यांनी आमची तक्रार नोंदवण्यास नकार दिला. सीसीटीव्ही फुटेजशिवाय आम्ही काहीही करू शकत नसल्याचं पोलिसांनी आम्हाला सांगितलं. विशेष म्हणजे पोलीस साधे घटनास्थळी आले नाहीत. पोलीस स्टेशन ६ वाजता बंद होते. त्यानंतर तेथे तक्रार घेतली जात नाही.

आम्ही दूतावासात जाण्याचाही प्रयत्न केला, पण तेही बंद असल्याचे समजले. दरम्यान अभिनेता विवेक दहियाने आपल्या इंस्टाग्रामवर तुटलेल्या कारचा व्हिडिओ शेअर केलाय. ज्यामध्ये कारची काच पूर्णपणे तुटलेली दिसतेय. गाडीची दुरवस्था पाहता चोरट्यांनी घाईघाईत साहित्य घेऊन पळ काढल्याचे जाणवतं. दिव्यांकानेही इंस्टाग्राम स्टोरी शेअर करत 'विवेक आणि मी ठीक असल्याची माहिती दिली. पण आमचा पासपोर्ट, महत्त्वाच्या आणि मौल्यवान वस्तू चोरीला गेल्यात. दूतावासाकडून मदतीची अपेक्षा असल्याचं दिव्यांका म्हणालीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात भाविकांची रेकॉर्ड ब्रेक गर्दी

Beed : शेतकऱ्यांच्या कपाशी पिक भुईसपाट; बहिणीचे लग्न करायचं कसं, शेतकऱ्यांनी फोडला टाहो

Solapur Flood : “पावसामुळे पिके बुडाली, माझ्या कुटुंबाची काळजी घ्या”, सोलापुरात अतिवृष्टीमुळे २ शेतकऱ्यांची आत्महत्या

Beed Crime: बीड पुन्हा हादरले! पत्रकाराच्या मुलाची निर्घृण हत्या, भरचौकात चाकूने सपासप वार करत जागीच संपवलं

5G Smartphones: कमी किमतीत स्वस्तात स्वस्त मोबाईल, १० हजार रुपयांखालील सर्वोत्तम ५जी स्मार्टफोन्स

SCROLL FOR NEXT