Divyanka Tripathi
Divyanka Tripathi Saam Tv
मनोरंजन बातम्या

Divyanka Tripathi : दिव्यांका त्रिपाठी बिग बॉस १६ मध्ये सहभागी होणार? पोस्ट शेअर करत दिली माहिती

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : टीव्ही विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी(Divyanka Tripathi) ही छोट्या पडद्यावरील टैलेंटेड अभिनेत्री आहे. चाहते त्याच्याकडे एक प्रभावी व्यक्तिमत्व म्हणून पाहतात. अभिनेत्री गेल्या वर्षी 'खतरों के खिलाडी ११' मध्ये सहभागी झाली होती आणि या शोची फर्स्ट रनरअप ठरली होती. 'बिग बॉस १६'(Bigg Boss) च्या लॉन्चिंगची बातमी समोर आल्यापासून दिव्यांका त्रिपाठी देखील या शोचा एक भाग असणार असल्याच्या बातम्या येत होत्या. याबद्दल त्याच्या चाहत्यांना खूप उत्सुकता होती. मात्र, दिव्यांकाने तिच्या अधिकृत ट्वीटर अकाउंटवर ट्वीट करून याबद्दल माहिती दिली आहे.

२० सप्टेंबर २०२२ रोजी, दिव्यांका त्रिपाठीने एका ट्विटद्वारे स्पष्ट केले की, ती या शोचा भाग होणार नाही. अभिनेत्रीने लिहिले, "हाय! माझे सर्व चाहते आणि प्रेक्षक हे जाणून घेण्यासाठी खूप उत्सुक असल्याने, मला असे ट्विट करणे भाग पडले आहे की - "मी बिग बॉसचा भाग नाही. या संदर्भात तुम्ही जे काही ऐकत आहात आणि वाचत आहात त्या सर्व खोट्या बातम्या आहेत." तुमच्या अपार प्रेमाबद्दल धन्यवाद!"

बिग बॉसचा १६वा सीझन १ ऑक्टोबर २०२२ पासून सुरू होऊ शकतो. अलीकडेच, शोचा प्रोमो देखील रिलीज झाला, ज्यावरून या सीझनच्या थीमची कल्पना आली. यावेळी बिग बॉसच्या घराची रचना अॅक्वा थीमवर करण्यात आली आहे. तसेच, प्रोमोमध्ये सांगण्यात आले होते की, यावेळी शोमध्ये कोणताही नियम नसेल. या शोच्या स्पर्धकांची अधिकृत यादी अद्याप जाहीर झालेली नाही. यात शालीन भानोत, शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा, मुनव्वर फारुकी, कनिका मान आणि शिवीन नारंग यांसारख्या सेलिब्रिटींची नावे चर्चेत असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, स्पर्धकांच्या यादीतच कोणता स्टार बिग बॉसचा भाग बनू शकेल यासाठी प्रेक्षकांना अजून वाट पहावी लागेल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : तब्येतीमुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

IPL 2024 LSG vs KKR: सुनिल नारायणच्या फटकेबाजीने LSG च्या गोलंदाजांना दाखवलं 'आस्मान'; लखनऊसमोर २३६ धावांचे आव्हान

Sharad Pawar News: शरद पवारांची प्रकृती अस्वस्थ, उद्याचे सर्व नियोजित कार्यक्रम रद्द

IPL 2024 : जडेजाच्या ऑलराउंडर खेळीने पंजाबचं प्लेऑफचं स्वप्न भंगलं; Points Table मध्ये CSKची टॉप-३ मध्ये एंट्री

Prajwal Revanna: प्रज्वल रेवन्नाविरोधात ब्लू कॉर्नर नोटीस जारी, जाणून घ्या काय आहे या नोटीसचा अर्थ

SCROLL FOR NEXT