Divyanka Tripathi  SAAM TV
मनोरंजन बातम्या

Divyanka Tripathi : घटस्फोटाच्या चर्चेदरम्यान दिव्यांका त्रिपाठीची अचानक तब्येत बिघडली, फोटो शेअर करत म्हणाली...

Divyanka Tripathi Diagnosed With Dengue : घटस्फोटाच्या चर्चेदरम्यान दिव्यांका त्रिपाठीची अचानक तब्येत बिघडली आहे. याची माहिती तिने इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर करून चाहत्यांना दिली आहे.

Shreya Maskar

सध्या टिव्हीची लोकप्रिय अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी (Divyanka Tripathi ) तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चांगलीच चर्चेत आहे. दिव्यांका त्रिपाठी पती विवेक दहियासोबत घटस्फोट घेणार असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर चांगल्याच रंगल्या आहेत. अशात आता दिव्यांका त्रिपाठीची तब्येत बिघडल्याची माहिती समोर आली आहे. तिने नुकतीच सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली हेल्थ अपडेट दिली आहे.

दिव्यांका त्रिपाठीने इन्स्टाग्रामवर एक स्टोरी पोस्ट केली आहे. ज्यात तिने आरशासमोर उभे राहून हातात थर्मामीटर पडकल्याचा फोटो शेअर केला आहे. तिच्या स्टोरीवरून दिव्यांकाला डेंग्यू (Diagnosed With Dengue ) झाल्याचे कळले आहे. ती खूप दिवसांपासून आजारी होती, तेव्हा टेस्ट केल्यावर तिला डेंग्यू झाल्याचे समजले आहे. चाहते तिच्या चांगल्या आरोग्याची प्रार्थना करत आहेत. दिव्यांका आणि विवेक दहिया (Vivek Dahiya) हे क्यूट कपल आहे.

दिव्यांका आणि विवेक कायम एकमेकांना पाठिंबा देताना दिसतात. दिव्यांका आणि विवेकने 2016मध्ये लग्नगाठ बांधली. आता लग्नाच्या 8-9 वर्षानंतर ही दोघे वेगळे होणार असल्याची चर्चा पाहायला मिळत आहे. अलिकडेच विवेक एअरपोर्टवर एका दुसऱ्या मुलीसोबत दिसला होता. त्यावरून त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चा सुरू झाल्या. मात्र यावर आता विवेकने मौन सोडले आहे.

divyanka tripathi

विवेक म्हणाला, "ही बातमी वाचताच मला आणि दिव्यांकाला हसू आले. आईस्क्रीम खाताना आम्ही ही न्यूज वाचली. ही न्यूज फक्त मनोरंजनासाठी आहे. यात काही तथ्य नाही. ही बातमी खोटी आहे. " दिव्यांका त्रिपाठीला 'ये है मोहब्बतें' मधून खूप लोकप्रियता मिळाली. तिची इशिमाची भूमिका चाहत्यांना खूपच आवडली. तिने अनेक हिंदी मालिका आणि वेब सीरिजमधून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: आगामी महानगरपालिका निवडणूकिच्या पार्श्वभूमीवर सोलापूर भाजपमध्ये जम्बो पक्षप्रवेश

Tridashansh Yog: अवघ्या काही तासांनी गुरु-बुध तयार करणार त्रिदशांश योग; 'या' राशींच्या नशीबी येणार अखेर श्रीमंती

Jalna News: मोठी बातमी! महानगरपालिकेच्या आयुक्तांना १० लाखांची लाच घेताना अटक

Bjp vs Shivsena: दिवाळीआधीच महायुतीत वादाचे फटाके, 'ठाण्यात भाजपचा महापौर होणार' भाजपचा स्वबळाचा नारा

Nashik Politics: नाशिकमध्ये भाजपची जबरदस्त खेळी; कोकाटेंचा भाजपमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT