Rahul Vaidya Daughter Name Ceremony Saam Tv
मनोरंजन बातम्या

Rahul Vaidya आणि Disha Parmar च्या मुलीचं बारसं, एकदम युनिक ठेवलं नाव

Rahul Vaidya And Disha Parmar Daughter Name: दोन महिन्यानंतर या कपलने आपल्या लाडक्या मुलीचे बारसं केलं. त्यांनी आपल्या मुलीचे खूपच युनिक नाव ठेवलं आहे.

Priya More

Rahul Vaidya Daughter Name Ceremony:

'बिग बॉस 14' (Bigg Boss 14) फेम राहुल वैद्य (Rahul Vaidya) आणि टीव्ही अभिनेत्री दिशा परमार (Disha Parmar) आई-बाबा झाल्यानंतर आपल्या मुलीसोबत टाइम स्पेंड करत आहेत. अनेकदा आपल्या मुलीसोबतचे फोटो ते सोशल मीडियावर (Social Media) शेअर करत असतात. आपल्या आयुष्यात परीचे आगमन झाल्यामुळे हे कपल खूपच खूश आहे. अशामध्ये दोन महिन्यानंतर या कपलने आपल्या लाडक्या मुलीचे बारसं केलं. त्यांनी आपल्या मुलीचे खूपच युनिक नाव ठेवलं आहे.

दिवाळीच्या निमित्ताने या कपलने आपल्या लाडक्या मुलीचे नाव ठेवले आहे. या कपलने नामकरण सोहळ्याचे काही खास फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या माध्यमातून त्यांच्या मुलीचे नाव समोर आले आहे. राहुल आणि दिशाच्या मुलीच्या नामकरण विधीला दोघांचे कुटुंबीय, नातेवाईक आणि जवळचे मित्र परिवार उपस्थित होते.

२० सप्टेंबरला 'बड़े अच्छे लगते हैं' फेम दिशा परमारने गोंडस मुलीला जन्म दिला. मुलीच्या जन्माच्या ५५ दिवसानंतर राहुल आणि दिशाने आपल्या लाडलीचे नाव ठेवले आहे. २० नोव्हेंबरला राहुल आणि दिशाची मुलगी दोन महिन्यांची होईल. या कपलने आपल्या लाडक्या मुलीचे नाव नव्या ठेवले आहे. नव्याच्या नामकरण विधीचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

मुलीच्या नामकरण विधीला दिशा परमारने ऑरेंज आणि पिंक कलरची सिल्क साडी नेसली होती. यामध्ये ती खूपच सुंदर दिसत होती. तर राहुलने डार्क ब्लू कलरची शेरवानी घातली होती. राहुल वैद्य आणि दिशा परमारच्या मुलीने मॅचिंग फ्रॉक आणि हेडबँड घातला होता. या कपलने आपल्या मुलीचे जे नाव ठेवले आहे त्याचा अर्थही खूपच सुंदर आहे. नव्या म्हणजे कौतुकास पात्र असलेली सुंदर मुलगी असे म्हटले जाते.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shirur News : धक्कादायक..सोने चोरीसाठी तोडला महिलेचा कान; दरोडेखोरांचे भयानक कृत्य

Panipuri : स्ट्रीट स्टाइल चटपटीत पाणीपुरीचे पाणी, फक्त वापरा 'हा' पदार्थ

Nail paint: नेलपेंट लावायची सवय असेल तर आजच व्हा सावधान अन्यथा... होतील 'हे' गंभीर परिणाम

Ballot Paper Voting : EVM नकोच, बॅलेट पेपरवरच निवडणुका घ्याव्यात; काँग्रेस, ठाकरे-पवार गट एकवटले

जिंकलात तर EVM मध्ये छेडछाड नाही, हरलात तर छेडछाड; बॅलेट पेपर मतदानाच्या मागणीची याचिका SC ने फेटाळली

SCROLL FOR NEXT