Tunisha Sharma And Sheezan Khan   Instagram @_tunisha.sharma_
मनोरंजन बातम्या

Tunisha Sharma: शीजानचे पोलिसांना चौकशीसाठी सहकार्य नाही, उलटसुलट उत्तरं देत असल्याचे पोलिसांची माहिती...

शीजान पोलिसांना चौकशीदरम्यान सहकार्य करत नसल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

Pooja Dange

Sheezan Khan Not Cooperating With Police: अभिनेत्री टुनिशा शर्माच्या आत्महत्येच्या बातमीने सर्वांना धक्का बसला आहे. टुनिशा शर्मा अवघ्या वीस वर्षाची होती. इतक्या लहान वयात घेतलेल्या या निर्णयाने खळबळ उडाली आहे. टुनिशा शर्माच्या आत्महत्येची चौकशी मुंबई पोलिस करत आहेत. टुनिशाचा बॉयफ्रेंड आणि तिचा सहकलाकार शीजान खानला पोलिसांनी अटक केली आहे.

टुनिशा शर्माच्या या केसमध्ये आता नवीन माहिती समोर आली आहे. पोलिसांच्या कोर्टाकडे म्हणण्यानुसार रिमांडची मागणी करत आहे. शीजान पोलिसांना चौकशीदरम्यान सहकार्य करत नसल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. पोलिसांनी भांडणाचे कारण विचारले असता, शीजान उलटसुलट उत्तरे देत आहे. एक आठवड्यापूर्वी टुनिशा आणि शीजानमध्ये भांडण झाले होते. त्यानंतर शीजानने टुनिशासोबत ब्रेकअप केला होता. तो तिच्याशी बोलतही नव्हता. (Actress)

मुंबई पोलिसांनी शीजान मोहम्मद खान याला अटक केली आहे. शीजानवर अभिनेत्रीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी एफआयआरही दाखल करण्यात आली आहे. हाती आलेल्या माहितीनुसार टुनिशा शर्मा आणि तिचा को-स्टार शीजान मोहम्मद खान अनेक दिवसांपासून एकमेकांना डेट करत होते. पण अचानक शीजनने अभिनेत्रीसोबत ब्रेकअप केले. त्यामुळे अभिनेत्री खूप अस्वस्थ राहू लागली. टुनिशा गेल्या काही दिवसांपासून डिप्रेशनच्या गोळ्या घेत होती. (Police)

पोलिसांनी शीजान मोहम्मद खानच्या विरोधात एफआयआर दाखल केला आहे. शीजनवर आयपीसी कलम ३०६ नुसार आत्महत्येस प्रवृत्त केल्यामुळे कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. शीजानची चौकशी सुरू आहे. शीजानचे काही मित्र आणि प्रॉडक्शन टीममधील काही लोक पोलिस स्टेशनमध्ये गेले आहेत. तसेच शूटिंग सेटवरही चौकशी सुरू आहे. टुनिशाने काल संध्याकाळी शूटिंग सेटवरील शीजानच्या मेकअप रूममध्ये गळफास लावून आत्महत्या केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ind Vs Eng सामन्यानंतर आकाश दीपला अश्रू अनावर, कॅन्सरग्रस्त बहिणीला समर्पित केला विजय

'मराठी लोक कुणाची भाकर खातायेत?' निशिकांत दुबे मराठीविरोधात बरळले| पाहा VIDEO

Solapur Crime: नवऱ्याचं डोकं सटकलं; चार्जरच्या वायरने बायकोचा गळा आवळला, नंतर स्वत:लाही संपवलं

Maharashtra Live News Update : पुण्यातील रामवाडीमध्ये पेट्रोल चोराने सहा मोटरसायकल जाळल्या

Sara Arjun: रणवीर सिंगसोबत 'धुरंधर' चित्रपटात झळकणारी अभिनेत्री नक्की आहे तरी कोण?

SCROLL FOR NEXT