Tumbbad 2 
मनोरंजन बातम्या

Tumbbad 2 : पुन्हा येणार 'हस्तर'; थरकाप उडवण्यासाठी तुंबाड परत एकदा येणार?

Bharat Jadhav

'तुंबाड' चित्रपटाला मिळणारा प्रतिसाद पाहून चित्रपटाचे निर्माते पुन्हा एकदा बॉक्स ऑफिसवर दहशत माजवण्यासाठी हस्तरला बोलवणार आहेत. हो, तुम्ही लावलेला अंदाज बरोबर आहे, निर्माते लवकरच तुंबाड-२ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आणणार आहेत. शुक्रवार १३ सप्टेंबर रोजी सोहम शाहचा हॉरर-थ्रिलर 'तुंबाड' चित्रपटगृहांमध्ये पुन्हा एकदा प्रदर्शित झाला. तुंबाड पुन्हा रिलीज करण्यात येणार असल्याची घोषणा केल्यापासून प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाविषयी प्रचंड उत्सुकता होती.

आधी रिलीज झाल्यानंतर या चित्रपटाला जसा प्रतिसाद मिळाला होता, तसाच प्रतिसाद पुन्हा प्रदर्शित झालेल्या तुंबडाला मिळत आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत नवे विक्रमही प्रस्थापित केले. चित्रपट पुन्हा प्रदर्शित झाल्यानंतर चाहते पुन्हा एकदा सिक्वेलबाबत प्रश्न करत आहेत. यावर आता निर्मात्यांनी उत्तर दिलंय.

तुंबाड चित्रपट पु्न्हा प्रदर्शित केल्यानंतर निर्मात्यांनी प्रेक्षकांना आणखी एक खूशखबर दिलीय. चित्रपट निर्मात्यांनी तुंबाडचा दुसरा भाग येणार असल्याची घोषणा केलीय. सोहम शाहने ही आनंदाची बातमी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांशी शेअर केलीय. एका भारी व्हिडिओसह चाहत्यांना सांगितले की, 'तुंबाड २' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मात्र हस्तर तुंबडमध्ये पूर्वीपेक्षा अधिक धोकादायक पद्धतीने परतणार असल्याचेही त्याने सांगितले आहे. सोहम शाहने एका नाट्यमय व्हिडिओसह 'तुंबाड 2' ची घोषणा केलीय. या व्हिडिओला 'प्रलय येईल, असं कॅप्शन दिलंय.

विनायक आणि त्याचा मुलगा पांडुरंग यांच्यापासून सुरू होणाऱ्या तुंबाडच्या सिक्वेलची घोषणा करणारा एक अतिशय नाट्यमय व्हिडिओ या अभिनेत्याने शेअर केलाय. व्हिडिओच्या पाठिमागे सोहम शाहचा आवाज ऐकू येतोय. तो म्हणतो- 'काळाचे चाक गोल आहे, जे निघून गेले ते परत येईल. दार पुन्हा एकदा उघडेल. कयामत पुन्हा येईल. हा व्हिडिओ तुंबड 2 कसा असेल याची एक झलक देतांना दिसतोय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

SCROLL FOR NEXT