Trisha Krishnan Politics Saam Tv
मनोरंजन बातम्या

Trisha Krishnan Politics: मुख्यमंत्री विजय यांच्यानंतर आता त्रिशा कृष्णनची राजकारणात एन्ट्री? जयललितांशी होतेय तुलना!

Trisha Krishnan Politics: अभिनेत्री त्रिशा कृष्णन राजकारणात प्रवेश करणार का? तिरुनेलवेली येथे समर्थकांनी यंग रिव्होल्युशनरी लीडर त्रिशा फोरम सुरू केला असून तिच्या पोस्टरची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे.

Shruti Vilas Kadam

Trisha Krishnan Politics: तमिळ चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री त्रिशा कृष्णन पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यावेळी तिच्या चित्रपटांमुळे नव्हे, तर राजकारणातील संभाव्य प्रवेशामुळे ती चर्चेत आहे. तमिळनाडूचे मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांच्यासोबत तिचे नाव जोडले जात असतानाच, आता त्रिशाच्या त्रिशा लवकरच राजकारणात प्रवेश करणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

सोमवारी (२३ नोव्हेंबर) तिरुनेलवेली येथे काही समर्थकांनी 'यंग रिव्होल्युशनरी लीडर त्रिशा फोरम' (Young Revolutionary Leader Trisha Forum) नावाची संघटना सुरू केली. या संघटनेची पोस्टर्स सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत. पोस्टरवर त्रिशा हिरव्या रंगाची साडी नेसून हात जोडून उभी असल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे, या संघटनेच्या बोधचिन्हातही हिरव्या रंगाचा वापर करण्यात आला आहे. हा रंग तमिळनाडूतील एआयएडीएमके (AIADMK) या राजकीय पक्षाशी संबंधित असल्याने या पोस्टरची अधिक चर्चा होत आहे. या पक्षाचे नेतृत्व यापूर्वी दिवंगत माजी मुख्यमंत्री जे. जयललिता यांनी केले होते.

त्रिशाने राजकारणात यावे, समर्थकांची इच्छा

त्रिशाने राजकारणात प्रवेश करून त्यांच्यासोबत काम करावे, अशी समर्थकांची इच्छा आहे. याच उद्देशाने त्यांनी या फोरमची स्थापना केल्याचे सांगितले आहे. केवळ सत्तेतील पदे मिळवणे हा या संघटनेचा उद्देश नसून तमिळनाडूमधील सामान्य जनतेच्या हक्कांसाठी लढा देणे हे त्यांचे ध्येय असल्याचे समर्थकांनी स्पष्ट केले आहे. मात्र, त्रिशा कृष्णनने अद्याप या संघटनेबाबत किंवा राजकारणात प्रवेश करण्याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.

विजयसोबत अनेक कार्यक्रमांमध्ये दिसली त्रिशा

दरम्यान, मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय आणि अभिनेत्री त्रिशा कृष्णन यांच्या एकत्र उपस्थितीचीही चर्चा होत आहे. निवडणूक प्रचाराच्या काळापासून विविध कार्यक्रमांमध्ये हे दोघे एकत्र दिसल्याचे सांगितले जात आहे. अलीकडेच वाय. एस. अनिल रेड्डी यांची मुलगी श्रेया आणि उज्ज्वल यांच्या विवाह सोहळ्याच्या रिसेप्शनमध्येही दोघे उपस्थित होते. याशिवाय, युनायटेड किंगडममध्ये अभिनेता अजित कुमार सहभागी असलेल्या रेसिंग स्पर्धेदरम्यानही ते एकत्र दिसले होते. स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमात त्रिशा पहिल्या रांगेत बसलेली दिसली होती. यामुळे राजकीय वर्तुळातही तिच्या उपस्थितीची चर्चा पूर्वीपासूनच रंगली होती.

Maharashtra News Live Update: भिवंडीत हाफिज मॅरेज हॉलच्या स्टोअर रूमला भीषण आग! अग्निशमन दल घटनास्थळी दाखल

Vehicle Insurance : वाहन विम्याचे होणार ४ भाग! १५ डिसेंबरपासून नवा नियम लागू; वाहनमालकांसाठी काय बदलणार?

राजकारणात मोठा भूकंप! 3 आमदार राजीनामा देणार?

हिंदू धर्मात वधू लग्नानंतर लाल बांगड्या का घालतात? हिरव्या-पिवळ्या का नाही? काय आहे पारंपरिक महत्त्व

Maharashtra Politics: आता मला विरोधी पक्ष म्हणून काम करावं लागेल, श्रीकांत शिंदेंचं मोठं विधान

SCROLL FOR NEXT