Jailer Trailer Shared On Social Media Instagram
मनोरंजन बातम्या

Jailer Trailer: दमदार अभिनय, नवा लूक, रजनिकांतच्या स्टायलिश लूकने वेधले लक्ष; बहुचर्चित ‘जेलर’चा ट्रेलर प्रदर्शित

Rajinikant Starrer Jailer Trailer Shared On Social Media: रजनीकांत आणि तमन्ना भाटिया मुख्य भूमिकेत असलेल्या ‘जेलर’चा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.

Chetan Bodke

Jailer Movie Trailer Release:

नेल्सन दिलीपकुमार दिग्दर्शित ‘जेलर’ (Jailer Trailer Out) ची सध्या प्रेक्षकांमध्ये एक वेगळीच क्रेझ निर्माण झाली आहे. चित्रपटातील ‘कावाला’ हे गाणं सोशल मीडियावर चांगलंच धुमाकूळ घालत आहे. ‘कावाला’च्या हिंदी रिमेकनेही प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. (Kaavaalaa Song)

गाण्यातील रजनीकांतच्या लूकपासून ते हटक्या स्टाईलपर्यंत सर्वांचीच चर्चा सध्या होतेय. ‘जेलर’मध्ये रजनीकांतच्या नावाची जादू आणि त्यांच्या अभिनयातील भारदस्तपणा पुन्हा एकदा प्रेक्षकांना अनुभवता येणार असल्याचं ट्रेलरवरुन स्पष्ट होत आहे. सध्या या दमदार ट्रेलरची सोशल मीडियावर बरीच चर्चा होत आहे.

नुकताच चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर शेअर करण्यात आला असून अवघ्या काही वेळातच या ट्रेलरने काही मिलियन्सचा टप्पा पार केला आहे. शेअर करण्यात आलेल्या ट्रेलरमध्ये, रजनीकांत पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहेत. तर चित्रपटात अभिनेत्री तमन्ना भाटिया आणि ‘बाहुबली’ मध्ये शिवगामीचे पात्र साकारणारी रम्या कृष्णन देखील प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. प्रदर्शनापूर्वी चित्रपटाचे नाव ‘थलैवर १६९’ असे होते, परंतु निर्मात्यांनी चित्रपटाचे नंतर नाव ‘जेलर’ असे ठेवण्यात आले.

रजनीकांत आणि तमन्ना भाटिया अभिनित ‘जेलर’च्या ट्रेलरची सुरुवात, एका दमदार ॲक्शनने होते. चित्रपटाचे कथानक एका जेलरभोवती फिरत आहे. तुरुंगात एका प्रसिद्ध टोळीतील एक गुंड कैद आहे.

जेलरच्या भूमिकेत रजनीकांत दिसत आहे. या जेलरच्या तावडीतून सुटण्यासाठी ते गुंड काही योजना आखतात. हे गुंड योजना आखताना त्यांचं जेलरसोबत काही विषयावरून थ्रिल होताना दिसत आहे.

रजनीकांतने जेलर मुथुवेलचे पात्र साकारले असून अतिशय कठोर तितकेच प्रामाणिकही आहेत. पण त्यांची एक बाजू घरातील कुटुंबीयांना माहित नाही. त्यांची ती बाजू फारच भयंकर आहे.

चित्रपटात प्रमुख भूमिकेत रजनीकांत, जॅकी श्रॉफ, तमन्ना भाटिया सह अनेक दाक्षिणात्य कलाकार दिसणार आहेत. येत्या १० ऑगस्टला चित्रपट प्रदर्शित होणार असून चित्रपटाचे दिग्दर्शन आमि कथेचे लेखन नेल्सन दिलीपकुमार यांनी केली आहे. तर चित्रपटाची निर्मिती सन पिक्चरने केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: ठाण्यात कंपनीची सुरक्षा भिंत कोसळली

Milk: रिकाम्या पोटी दूध प्यायल्याने काय होते?

Evil Eye: नजर लागल्यावर दिसू लागतात 'हे' ४ संकेत, मुळीच करू नका दुर्लक्ष!

Tulja Bhawani : तुळजाभवानी देवीचे १ ऑगस्टपासून दर्शन बंद; भाविकांसाठी केवळ मुखदर्शन

Maharashtra Politics : जुन्या कार्यकर्त्यांनी सतरंज्या उचलायच्या का? भाजपमधील इनकमिंगवरून माजी आमदाराने सांगितली मनातील सल

SCROLL FOR NEXT