Marathi Celebrity Tribute To Na Dho Mahanor : ज्येष्ठ साहित्यिक, कवी आणि गीतकार ना. धों. महानोर यांचे आज निधन झाले आहे. वयाच्या ८१ व्या वर्षी त्यांनी पुण्यातील रुबी हॉल क्लीनिक रुग्णलयात अखेरचा श्वास घेतला. किडनीच्या आजाराने त्रस्त असल्याने महानोर गेले काही दिवस व्हेंटीलेटरवर होते. पत्नीच्या निधनानंतर यांची प्रकृती देखील खालावली होती.
ना. धों. महानोर यांच्या जाण्याने सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. महानोर यांचे चाहते, राजकिय नेते आणि सिनेसृष्टीतील कलाकार सोशल मीडियावर पोस्ट करत भावना व्यक्त करत श्रद्धाजंली अर्पण करत आहेत.
सोनाली कुलकर्णी पोस्ट
अभिनेत्री सोनाली कुलकर्णाने सोशल मीडियावर पोस्ट करत ना. धों. महानोर आणि नितीन देसाई यांच्या आठवणी शेअर केल्या आहेत. तिने पोस्टमध्ये लिहिले आहे की, 'कालच्या धक्क्यातून अजून सावरतां आलं नाही आणि आज ही आणखी एक दुःखद बातमी आली… नितीन देसाईंनंतर…ना.धो.महानोर….. हा असा कसा योगायोग ठरावा…!
माझ्या आयुष्यात ज्यांनी “अजिंठा” आणला असे #NitinDesai आणि या महाकाव्याचे जनक #NaDhoMahanor आज आपल्यात नाही, पण त्यांच्या कलाकृतीं अजारामर राहतील. आपल्याला आयुष्यभर उर्जा देत रहातील हे नक्की.
#NitinChandrakantDesai यांचं असं जाणं जिवाला चटका लावून जाणारं आहे. त्यांचं कामाबद्दल, कलेबद्दलचं प्रेम, वेड, हे खूप काही शिकवून गेलं.
त्यांचं कला विश्वातलं कार्य हे अभिमानास्पद आहेच आणि ते पुढील अनेक वर्ष कलाकारांना प्रेरणादायी ठरेलच… #respect
#Padmashri #NamdeoDhondoMahanor यांना #Ajintha या चित्रपटाच्या निमित्ताने भेटण्याचा योग आला होता.. त्यांचं “अजिंठा” नामक स्वप्न पडद्यावर साकारण्याचं भाग्य लाभलं
रानकविता आज खऱ्या अर्थाने ओसाड झाल्या..
घन ओथंबून येती.. हे शब्दांत व्यक्त करणारे ना.धों. महानोर आज इहलोकीच्या प्रवासाला निघून गेले. रानापासून मनापर्यंत पोहचलेला हा कवी माणूस.
“जैत रे जैत” ते “अजिंठा” ची गाणी ऐकताना महानोर सर तुमची आठवण येत राहील.. भावपूर्ण श्रद्धांजली.' (Latest Entertainment News)
तर अभिनेता सुबोध भावेने घन ओथंबून येती... येती या गाण्यासह ना. धों.चा फोटा पोस्ट करत त्यांना श्रद्धाजंली वाहिली आहे. त्याचबरोबर आदिनाथ कोठारे, उर्मिला कोठारे, गौरव मोरे यांनी देखील महानोर यांना श्रद्धाजंली वाहिली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.