Tu Aa Dilbara Song Out You Tube
मनोरंजन बातम्या

Tu Aa Dilbara Song Out: तमन्ना भाटियाच्या ‘कावाला’चं हिंदी व्हर्जन प्रदर्शित, अफलातून हूक स्टेप्स पाहून नेटकरी भारावले

Kaavaalaa Hindi Version Song: सध्या सोशल मीडियावर ‘कावाला’चं हिंदी व्हर्जन प्रदर्शित झालं असून या गाण्याची चाहत्यांमध्ये बरीच चर्चा सुरू आहे.

Chetan Bodke

Tu Aa Dilbara Song Shared On Social Media: सध्या दाक्षिणात्य चित्रपटांची बॉक्स ऑफिसवर चांगलीच क्रेझ दिसून येत आहे. अनेक साऊथ चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर बॉलीवूडच्या बिग बजेट चित्रपटांना टक्कर देताना दिसत आहेत. सोबतच चित्रपटातील गाणेही सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. साऊथ इंडस्ट्रीत अभिनेत्री तमन्ना भाटियाच्या ‘कावाला’ या गाण्याची तुफान चर्चा सुरू आहे. सध्या सोशल मीडियावर हे गाणं प्रचंड ट्रेंड होत असून नुकतंच प्रेक्षकांच्या भेटीला ‘कावाला’चे हिंदी व्हर्जन आले आहे.

येत्या १० ऑगस्टला तमन्नाचा ‘जेलर’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चार्टबस्टर या तमिळ गाण्याने प्रेक्षकांची मने जिंकल्यानंतर आता हे गाणं हिंदीत ही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘कावाला’ या गाण्याचं हिंदी व्हर्जन असलेलं ‘तू आ दिलबरा’ हे गाणं आज सोशल मीडियावर प्रदर्शित झालं आहे. या म्युझिक लाँचिंग इव्हेंटमध्ये तमन्नाने कॅमेऱ्यासमोर गाण्यातील हुक स्टेप्स करून दाखवले आहेत. सध्या अभिनेत्रीचे हे हूक स्टेप करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

‘कावाला’ हे गाणं शिल्पा राव यांनी गायलं असून त्या गाण्याचे हिंदी व्हर्जन सिंधुजा श्रीनिवासनने गायले आहे. तर रकीब आलमने हे गाणं संगीतबद्ध केलं आहे. सोशल मीडियावर ‘कावला’ गाण्याचे रील्स तुफान व्हायरल होत आहे. ‘कावाला’ प्रमाणेच ‘तू आ दिलबरा’ हे गाणं देखील प्रेक्षकांची मनं जिंकून घेईल यात शंका नाही. (Tollywood)

तमन्नाच्या ‘जेलर’चित्रपटाबद्दल बोलायचे तर, नेल्सन दिलीपकुमार लिखित आणि दिग्दर्शित, हा चित्रपट येत्या १० ऑगस्ट रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. चित्रपटात तमन्ना आणि रजनीकांत व्यतिरिक्त मोहनलाल, जॅकी श्रॉफ, डॉ शिवा राजकुमार, रम्या कृष्णन, योगी बाबू, वसंत रवी आणि विनायकन हे कलाकार देखील प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. (Entertainment News)

तमन्नाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर, अभिनेत्रीकडे ‘जेलर’ सोबत तेलुगु ‘भोला शंकर’, मल्याळम ‘बांद्रा’ तर तमिळमधील ‘अरनमनाई ४’ सध्या तिचे इतके चित्रपट प्रदर्शनाच्या प्रतिक्षेत आहेत. सोबतच तमन्ना भाटिया निखिल अडवाणी दिग्दर्शित ‘वेदा’ मध्ये जॉन अब्राहमसोबत प्रमुख भूमिकेत झळकणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tirgrahi Yog: 50 वर्षांनंतर बनणार त्रिग्रही राजयोग; शुक्र-सूर्य देवाच्या कृपेने काही राशींचं आयुष्य पालटणार

Kendra Trikon Rajyog: 12 महिन्यांनी शुक्र बनवणार केंद्र त्रिकोण राजयोग; 'या' राशींना मिळणार भाग्याची साथ

Beed News : बीडमध्ये पावसाचा कहर; जिल्ह्यातील शाळा-कॉलेजला उद्या सुट्टी जाहीर

BMC Election 2025 : ठाकरे बंधू एकत्र, मुंबई महापालिका कोण जिंकणार? भाजप नेत्यांचं मोठ भाष्य, VIDEO

Pune Rain: लोणी काळभोरमध्ये पावसाचं थैमानं, शेती पाण्याखाली, घरात शिरलं पाणी; पाहा ड्रोन VIDEO

SCROLL FOR NEXT