Samantha Prabhu Saam Tv
मनोरंजन बातम्या

Samantha Prabhu: आधी कोलकाता, आता बदलापूर; सुरक्षितता, महिला अत्याचाराच्या घटनांवर अभिनेत्री थेट बोलली

Samantha Prabhu Reaction On Women Safety In Society: कोलकत्ता डॉक्टर महिला अत्याचार घटनेनंतर बदलापूरमधील घटनेने संपूर्ण देश हादरला आहे. या घटनेनंतर महिलांच्या सुरक्षेबाबत अनेक प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.

Siddhi Hande

सध्या देशात पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. कोलकातामध्ये डॉक्टर महिलेवर अत्याचार करुन तिची हत्या करण्यात आली होती. त्यानंतर आता बदलापूरमध्ये दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार झाला आहे. त्यामुळे संपूर्ण देशभरात संतापाची लाट उसळली आहे. देशभरात अनेक ठिकाणी आंदोलन सुरु आहे. यामुळे पुन्हा एका महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. याच घटनांवर देशातील अनेक राजकीय नेते,सेलिब्रिटींना प्रतिक्रिया दिली आहे. नुकतीच साउथ अभिनेत्री समांथा प्रभूने प्रतिक्रिया दिली आहे.

समांथा प्रभूने एका कार्यक्रमात महिलांच्या सुरक्षेबात विचारलेल्या प्रश्नावर प्रतिक्रिया दिली आहे. समांथा म्हणाली की,'हे जे काही आहे ते भीतीदायक आहे. आपल्या सर्वांचेच याकडे लक्ष आहे. भविष्यात बदल होईल, याकडे आपले लक्ष आहे. भविष्यात नक्कीच बदल होईल. हा बदल करण्यासाठी आपल्याला आपलेच विचार बदलायला हवे. मी देशात होणाऱ्या बदलाच्या दृष्टीने सकारात्मक आहे. समांथाने महिलांच्या सुरक्षिततेबाबत बदल होईल', असं म्हटलं आहे.

समांथाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, समांथा अनेक दिवसांपासून चित्रपटसृष्टीपासून लांब आहे. समांथा लवकरच सिटाडेल या सीरीजमधून चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. या सीरीजमध्ये ती वरुण धवनसोबत दिसणार आहे. ही सीरीज ७ नोव्हेंबर २०२४ रोजी प्राइम व्हिडिओवर रिलीज होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: वर्ध्यात वीज पडून दोन ठार, एक गंभीर

Ajit Pawar: मागच्या आणि आताच्या अजित पवारांमध्ये खूप फरक; उपमुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले? VIDEO

Asia Cup 2025 फायनलपूर्वी सूर्यकुमार यादवला धक्का, ICC ने सूर्यावर केली मोठी कारवाई

युजरच्या 'स्कीम'ची जोरदार चर्चा! 'फॉलो करा अन् मिळवा 1GB, 2GB इंटरनेट पॅक', पठ्ठ्याचे अवघ्या ४ महिन्यातच वाढले 15000 फॉलोवर्स

जिथं दहशत तिथंच धिंड, पुण्यात आरोपींना आणलं गुडघ्यावर|VIDEO

SCROLL FOR NEXT