Prakash Raj On Kangana Ranaut Tejas Film Saam Tv
मनोरंजन बातम्या

Prakash Raj On Tejas Film: ‘तुम्ही थांबा, तुमचा चित्रपट लवकरच...’; प्रकाश राज यांनी कंगना रनौतचा ‘तो’ व्हिडीओ शेअर करत उडवली खिल्ली

Prakash Raj Tweet: दाक्षिणात्य अभिनेते प्रकाश राज यांनी सोशल मीडियावर कंगना रनौतची खिल्ली उडवली आहे.

Chetan Bodke

Prakash Raj On Kangana Ranaut Tejas Film

बहुचर्चित कंगना रनौतचा ‘तेजस’ चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. चित्रपटाची जरी सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत असली तरी, चित्रपटाला प्रेक्षकांकडून खास प्रतिसाद मिळत नाही. नुकतंच कंगनाने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये स्वतः कंगनाने प्रेक्षकांना थिएटरमध्ये जाऊन चित्रपट पाहण्याची विनंती केली आहे. हाच व्हिडीओ शेअर करुन दाक्षिणात्य अभिनेते प्रकाश राज यांनी तिची खिल्ली उडवली आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

प्रकाश राज कायमच सोशल मीडियावर आपल्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत राहतात. गेल्या काही दिवसांपूर्वी प्रकाश राज यांनी चांद्रयान ३ वर देखील टिप्पणी केली होती. त्यामुळे त्यांना नेटकऱ्यांनी प्रचंड ट्रोल केलं होतं. अशातच पुन्हा एकदा प्रकाश राज सोशल मीडियावर चर्चेत आले आहेत. त्यांनी कंगनाचा एक व्हिडीओ ट्विट करत तिची खिल्ली उडवलीय. आपल्या पोस्टमध्ये प्रकाश राज म्हणाले, “भारताला नुकतंच २०१४ मध्ये स्वातंत्र्य मिळालं आहे. कृपया तुम्ही थांबा. तुमचे चित्रपट लवकरच चांगली कमाई करतील.”

प्रकाश राज यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स (ट्वीटर)वर कंगनाची व्हिडीओ शेअर केली आहे. त्या व्हिडीओमध्ये ती म्हणाली, “माझा नुकताच बॉक्स ऑफिसवर ‘तेजस’ चित्रपट प्रदर्शित झाला. जितक्यांनी हा चित्रपट पाहिला, तितक्या सर्वांनीच चित्रपटाचे कौतुक केले आहे. कोव्हिडनंतर हिंदी फिल्म इंडस्ट्री त्या धक्क्यातून अजुनही सावरलेली नाही. प्रेक्षकवर्ग ९९ टक्के चित्रपटांना कमाईसाठी संधी ही देत नाही. सध्याच्या आधुनिक जगात सर्वांकडे स्मार्टफोन, स्मार्ट टिव्ही आहेत. पण थिएटर हा आधीपासूनच समाजाचा एक अविभाज्य घटक आहे. माझी सर्व मल्टिप्लेक्सच्या प्रेक्षकांना विनंती आहे की, जर तुम्ही याआधी ‘उरी’, ‘मेरी कॉम’ आणि ‘नीरजा’ सारखे चित्रपट पाहिले असतील, तर तुम्हाला ‘तेजस’ देखील आवडेल. जय हिंद.”

चित्रपटाच्या कमाईबद्दल सांगायचे तर, सॅकल्निच्या अहवालानुसार, चित्रपटाने तीन दिवसामध्ये ३.८० कोटी इतकी कमाई केली आहे. पहिल्या दिवशी १.२५ कोटी, दुसऱ्या दिवशी १. ३० कोटी, तर तिसऱ्या दिवशी १. २५ कोटींची कमाई केली आहे. कंगनाचा हा चित्रपट तब्बल ४५ कोटी खर्चून तयार केला आहे. इतक्या धिम्या गतीने चित्रपट कमाई करत असून निर्मात्यांनी केलेला खर्चही वसूल करणे कठीण जाईल, असं चित्र निर्माण झालं आहे. (Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Success Story: उच्चशिक्षण घेऊनही गावची माती सुटेना, मावळचा तरूण करतोय कोंबडी पालनाचा व्यवसाय; महिन्याला लाखो रुपयांची कमाई

Sandeep Deshpande: आमचा बाप बनण्याचा प्रयत्न करू नका, संदीप देशपांडेंनी व्यापाऱ्यांना सुनावलं

Pakistan Hockey Team : पाकिस्तानी हॉकी संघ भारतात येणार; आशिया कप खेळण्याची मंजुरी | VIDEO

Dora Cake Recipe: लहान मुलांच्या आवडीचा डोरा केक आता बनवा घरी, सोपी आहे रेसिपी

Monsoon AC temperature: पावसाळ्याच्या दिवसात एसीचं टेंपरेचर किती ठेवलं पाहिजे?

SCROLL FOR NEXT