Naga Chaitanya Buy Porsche GT3 RS New Car Saam Tv
मनोरंजन बातम्या

Naga Chaitanya Buy New Car : नागा चैतन्यने खरेदी केली Porsche 911 GT3 RS स्पोर्ट्स कार, किंमत वाचून डोळे फिरतील

Naga Chaitanya Buy Porsche GT3 RS New Car : टॉलिवूड अभिनेता नागा चैतन्यने नुकतीच नवीन स्पोर्ट्स कार Porsche 911 GT3 RS कार खरेदी केली आहे.

Chetan Bodke

अभिनेता नागा चैतन्य टॉलिवूड सिनेसृष्टीतील एक प्रसिद्ध अभिनेता आहे. नेहमीच आपल्या चित्रपटांमुळे चर्चेत राहणारा अभिनेता सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. अभिनेता नागा चैतन्य ह्याने नुकतीच लक्झरियस स्पोर्ट्स कार खरेदी केली आहे. अभिनेत्याने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत चाहत्यांनाही 'गुड न्यूज' शेअर केलेली आहे. अभिनेत्याने नुकतीच नवीन स्पोर्ट्स कार Porsche 911 GT3 RS कार खरेदी केली आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, Porsche 911 GT3 RS ची भारतात शोरूम किंमत 3.51 कोटी रुपये इतकी आहे. नागा चैतन्यचा नव्या स्पोर्ट्स कारसोबतचा फोटो पोर्शे कंपनीने त्यांच्या इन्स्टाग्राम हँडलवरून शेअर केलेला आहे. "पोर्शे कुटुंबात अक्किनेनी नागा चैतन्यचं स्वागत आहे. Porsche 911 GT3 RS ही कार त्यांना सुपूर्द करताना आनंद होत आहे. याबरोबर त्यांच्या अनेक चांगल्या आठवणी निर्माण होवोत... हिच सदिच्छा", असं म्हणत कंपनीने नागा चैतन्यचं अभिनंदन केलं आहे. अभिनेत्यावर चाहत्यांसह अनेक सेलिब्रिटींनीही शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

नागा चैतन्यची नवीन Porsche 911 GT3 RS स्पोर्ट्स कार जीटी मेटॅलिक सिल्व्हर शेडमध्ये आहे. नागा चैतन्य महागड्या गाड्यांचा शौकीन आहे. त्याच्याकडे फेरारी, रेंज रोव्हर, BMW आणि मर्सिडीज सारख्या आलिशान गाड्या त्याच्याकडे आहेत. आता त्याच्या ताफ्यात पॉर्शे ९११ ही अलिशान स्पोर्ट्स कार दाखल झाली आहे. या कारचं रजिस्ट्रेशन १७ मे २०२४ रोजी करण्यात आली आहे. नागा चैतन्यची ही कार हैदराबादमधील पहिली असल्याचे बोलले जात आहे. नागा चैतन्य त्याच्या नवीन कारमध्ये शहरात फिरत असल्याचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Morning Yoga Exercise: फिट राहण्यासाठी सकाळी करा फक्त ही 5 योगा

Konkan Kanya Express: कोकणवासीयांसाठी आनंदाची बातमी! आता सीट पक्कीच समजा; ‘कोकणकन्या-मांडवी’ला जादा डबे

Nashik News: नरहरी झिरवाळांच्या मतदारसंघात ACB ची मोठी कारवाई, महिला सरपंचाला लाच घेताना रंगेहाथ पकडलं

Maharashtra Live News Update: मंत्री नरहरी झिरवळांच्या मतदारसंघात एसीबीची मोठी कारवाई

Success Story: मल्टी नॅशनल कंपनीतील नोकरी सोडली, UPSC परीक्षेची तयारी केली, तिसऱ्या प्रयत्नात मिळवले यश; IAS अभिषेक शर्मा यांचा प्रवास

SCROLL FOR NEXT