Neetu Kapoor and Alia Bhatt image Saam Tv
मनोरंजन बातम्या

Neetu Kapoor Birthday : आलियाने दिल्या सासूला हटके शुभेच्छा; म्हणाली, सासू, मैत्रीण अन्...

सून आलिया भट्ट आणि मुलगी रिद्धिमा कपूर साहनी हिनेही नीतू यांना हटके अंदाजात शुभेच्छा देऊन त्यांच्याबद्दलचं प्रेम व्यक्त केलं आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : बॉलिवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्री नीतू सिंह-कपूर(Neetu Kapoor) यांचा आज वाढदिवस आहे. नीतू यांच्यावर बॉलिवूड इंडस्ट्रीमधून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. बॉलिवूडच्या दिग्गज कलाकारांकडून त्यांना शुभेच्छा देणाऱ्या पोस्ट सोशल मीडियावर शेअर करत आहेत. त्याचवेळी सून आलिया भट्ट(Alia Bhatt) आणि मुलगी रिद्धिमा कपूर साहनी हिनेही नीतू यांना हटके अंदाजात शुभेच्छा देऊन त्यांच्याबद्दलचं प्रेम व्यक्त केलं आहे.

आलियाने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक स्टोरी पोस्ट केली आहे. या स्टोरीत तिने नीतू कपूर यांच्यासोबतचा तिच्या हळदीच्या कार्यक्रमातील फोटो शेअर केला आहे. फोटोमध्ये नीतू या आलियाच्या कपाळावर किस घेताना दिसत आहे. 'सर्वात सुंदर व्यक्तीला वाढदिवसाच्या शुभेच्छा.. माझी सासू , मैत्रीण आणि लवकरच होणारी आजी... तुमच्यावर माझे खूप प्रेम आहे', असे आलियाने म्हटले आहे.

आलियानंतर नीतू कपूर यांची मुलगी रिद्धिमा कपूर साहनी हिनेही शुभेच्छावर्षाव केला आहे. रिद्धिमाने तिच्या इन्स्टाग्राम हॅंडलवर नीतू यांच्यासोबतचा एक क्यूट सेल्फी शेअर केला आहे. 'हॅपी बर्थडे लाइफलाइन, लव्ह यू ऑलवेज अॅण्ड एव्हरीवेअर', असे रिद्धिमाने म्हटले आहे. नीतू यांनी रिद्धिमाच्या या क्यूट पोस्टवर प्रतिक्रिया देतानाच हार्ट इमोटिकॉनसह आभार मानले आहेत.

नीतू कपूर सध्या खूप खुश आहेत. कारण त्या लवकरच आजी होणार आहेत. त्यांचा मुलगा रणबीर कपूर आणि सून आलिया भट्ट यांच्या होणाऱ्या बाळाचं स्वागत करण्यासाठी त्या खूप एक्साइट आहेत. अलीकडेच आलियाने तिच्या इन्स्टाग्रामवर गोड बातमी देणारा एक फोटो शेअर केला होता.

'जुग जुग जिओ' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सध्या धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाच्या यशामुळं त्या खूप आनंदी आहेत. या चित्रपटाद्वारे नीतू यांनी तब्बल ९ वर्षांनी बॉलिवूडमध्ये कमबॅक केला आहे. 'जुग जुग जिओ' पूर्वी नीतू सिंह-कपूर यांनी २०१३ मध्ये 'बेशरम' या चित्रपटात अभिनय केला होता. या चित्रपटात नीतू यांनी रणबीर कपूर आणि ऋषी कपूर यांच्यासोबत काम केले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shravan Month: श्रावण महिन्यात मांसाहार का खाऊ नये? धार्मिक नव्हे तर 'हे' आहे वैज्ञानिक कारण

Beed News: बीडमध्ये तरुणाला बेदम मारहाण; गुन्हा दाखल, तरीही आरोपी मोकाट,पोलिसांवर प्रश्नचिन्ह|VIDEO

Shocking News : नवविवाहित जोडप्यानं एकत्रच वशिष्ठी नदीत उडी मारली, काही महिन्यांपूर्वीच झालं होतं लग्न

Maharashtra Live News Update: पुण्यात कुत्र्याला वाचविण्यासाठी अतिसाहस अंगलट

Anardana Pudina Chutney : पंजाब स्पेशल 'अनारदाना पुदिना चटणी', आंबट-गोड चव जेवणाची वाढवेल रंगत

SCROLL FOR NEXT