Ankita Lokhande  saam tv
मनोरंजन बातम्या

Ankita Lokhande: अर्चना, अंकिता की, अजून काही; नेमक हिचं खरं नाव काय ?

बॉलिवूड क्षेत्रात बऱ्याच कलाकारांचे नावं हे खरे नाहीत. किंबहूना आपल्याला लाडक्या कलाकाराचे खरे नाव बऱ्याच चाहत्यांना माहित नसते.

Chetan Bodke

Ankita Lokhande: बॉलिवूड अभिनेत्री अंकिता लोखंडे आज ३८ वा वाढदिवस साजरा करत आहे. तिचा जन्म इंदौरमध्ये एका मराठी परिवारात १९ डिसेंबर १९८४ मध्ये जन्म झाला. बॉलिवूड क्षेत्रात बऱ्याच कलाकारांचे नावं हे खरे नाहीत. किंबहूना आपल्या लाडक्या कलाकाराचे खरे नाव बऱ्याच चाहत्यांना माहित नसते. अंकिताचं खरं नाव तनुजा लोखंडे असे आहे. तिने एका सर्वसामान्य घरातून बॉलिवूडक्षेत्रात पदार्पण केले होते.

अंकिताने मालिकेसोबतच काही चित्रपटांतही काम केले आहे. अंकिताने बॉलिवूडमध्ये 'बागी 3' आणि 'मणिकर्णिका: द क्विन ऑफ झाशी' या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली आहे. २००४ मध्ये मुंबईत तिने आपल्या करियरची सुरुवात मॉडेलिंगपासून केली होती. सोबतच अंकिताने 'बाली उम्र को सलाम' या मालिकेतून मनोरंजन क्षेत्रात पदार्पण केले होते. त्यानंतर तिने 'पवित्र रिश्ता' या मालिकेच्या माध्यमातून पुन्हा एकदा टेलिव्हिजनवर काम करण्याची संधी मिळाली. सोबतच अंकिता 'झलक दिखला जा'च्या चौथ्या सीझनमध्ये दिसली होती.

तेव्हापासून तिचा बराच मोठा चाहतावर्ग निर्माण झाला होता. तेव्हापासून अंकिताची ओळख एक उत्कृष्ट अभिनेत्री म्हणून झाली. अंकिता आणि सुशांत सिंह राजपुतची ओळख 'पवित्र रिश्ता'च्या सेटवर झाली होती.

ओळख झाल्यानंतर दोघेही खूप चांगले मित्र म्हणून राहिले. पण कालांतराने त्यांच्या मैत्रीचे रुपांतर हे प्रेमामध्ये झाले. २०१६ पर्यंत हे दोघेही एकमेकांच्या प्रेमात होते, पण कालांतराने त्यांच्या नात्यात दुरावा आला होता.

अंकिताने गेल्या वर्षी १४ डिसेंबर रोजी बॉयफ्रेंड विक्की जैनसोबत लग्नगाठ बांधत एकमेकांनी सात जन्म एकत्र राहण्याचे वचन दिले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : चंद्रपूर, गोदिंया, गडचिरोलीला रेड अलर्ट

Bullet Train: मुंबईकर प्रवाशांसाठी गुड न्यूज! मुंबईतील २ मेट्रो बुलेट ट्रेनला जोडणार

MS Dhoni : एमएस धोनी किती कोटींचा मालक?

Shubman Gill : इंग्लंडमध्ये १ कसोटी सामना जिंकला, कॅप्टन गिल थेट रिटायरमेंटबद्दल बोलला

Pro Govinda Season: आजपासून ३ दिवस रंगणार प्रो गोविंदा सीझन ३ चा अंतिम सामना; १६ गोविंदा पथकं एकमेकांसमोर उभी ठाकणार

SCROLL FOR NEXT