Jennifer Mistry Post
Jennifer Mistry Post Saam Tv
मनोरंजन बातम्या

Jennifer Mistry Post: मिसेस सोढीने निर्मात्यांना चारित्र्यावरून सुनावलं बरंच काही, स्टोरी शेअर करत म्हणाली...

Chetan Bodke

Jennifer Mistry Social Media Post: ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ फेम जेनिफर मेस्त्री बंसीवालनं नुकतंच मालिकेच्या निर्मात्यांसह, प्रोजेक्ट मॅनेजर आणि एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसरने लैंगिक छळाचा आरोप करत पोलिसांकडे लेखी तक्रार केली आहे. मालिकेच्या निर्मात्यांनी जेनिफरवर बिनबुडाचे आरोप करत असून तिच्या आरोपांत कुठलेच तथ्य नसल्याची माहिती दिली. तेव्हापासून जेनिफर सोशल मीडियावर कमालीची सक्रिय झाली आहे. नुकतेच जेनिफरने एक स्टोरी शेअर केली असून त्यात तिने तिच्या मनातील खदखद व्यक्त करण्याचा प्रयत्न केला आहे.

गेल्या १५ वर्षांपासून ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’चा भाग असलेल्या जेनिफरने नुकतंच काही दिवसांपुर्वी मालिका सोडली. मिसेस सोढीच्या भूमिकेत असलेल्या जेनिफर मिस्त्रीने मालिकेचे प्रोजेक्ट मॅनेजर, एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर आणि निर्मात्यांवर लैंगिक छळाचा आरोप करत पोलिसांकडे लेखी तक्रार केली आहे.

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ चे निर्माते असित कुमार मोदींनी अभिनेत्रीने केलेले सर्व आरोप फेटाळत हे सर्व आरोप खोटे असल्याची माहिती आहे. जेनिफर निर्मात्यांची प्रतिमा बदनाम मलिन करण्याचा प्रयत्न करत असल्याचं असित कुमार यांनी सांगितलं. सोबतच, जेनिफरने शो सोडला नसून तिला शोमधून बाहेर काढण्यात आल्याची निर्मात्यांनी दिली.

सोशल मीडियावर स्टोरी शेअर करत जेनिफर मेस्त्री म्हणतो, ‘काही लोकं माझे चारित्र्य बदनाम करण्यासाठी निघाले आहेत, त्यांनी स्वतःचंच चारित्र्य बदलण्याची गरज आहे.’ जेनिफरने तिच्या स्टोरीवर ही पोस्ट शेअर केली आहे. जेनिफरने आणखी एक स्टोरी पोस्ट केली ज्यामध्ये तिने लिहिले- ‘इतरांना खूश करण्यासाठी कधीही आपल्या मूल्यांशी तडजोड करू नका. स्वाभिमानाने तिथून निघून जा.’

Jennifer Mistry Post

मालिकेमध्ये आत्माराम भिडेची भूमिका साकारणारा टेलिव्हिजन अभिनेता मंदार चांदवडकर याने काही दिवसांपुर्वी या वादावर आपली प्रतिक्रिया दिली होती. त्याची प्रतिक्रिया आल्यापासून जेनिफरला अभिनेत्याचा राग आला आहे. जेनिफर मिस्त्रीने असित मोदींवर हा शो नेहमीच पुरूषांनाच व्यवस्थित वागणुक देतो. फक्त इथे पुरूष कलाकारांसोबतच कामाच्या बाबतीत तडजोड केली जाते. असा आरोप लावला होता.

मालिकेतील भिडे मास्तर म्हणजेच मंदार चांदवडकरने सुद्धा या प्रकरणासंबंधित प्रतिक्रिया दिली आहे. मंदार म्हणतो, “जेनिफर मिस्त्रीने असं का केलं याबद्दल मला काहीच माहित नाही. त्यांच्यात असं काय घडलं याची ही मला कल्पना नाही. हे पुरुष-अराजकीय स्थान नाही. मालिकेच्या सेटचा शो म्हणजे, ताजं वातावरणं असलेलं एक आनंदी ठिकाण आहे, जर असं नसतं तर हा शो इतक्या वर्ष चाललाच नसता.”

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: सातारा, दुष्काळ आणि शरद पवार; साताऱ्याच्या सभेत देवेंद्र फडणवीस यांची चौफेर फटकेबाजी

SUV Cars in India: जबरदस्त लूक आणि पॉवरफुल इंजिन, 10 लाख रुपयांपेक्षा कमी किमतीत येतात या SUV

Porsche New Car: व्हॉईस कमांड, 6 एअरबॅग्ज आणि 270kmpl स्पीड; पोर्शची डॅशिंग कार भारतात लॉन्च

Mumbai News : जेव्हीएलआर मार्गावरील वाहतुकीत ३१ मे पर्यंत बदल, नेमकं काय आहे कारण?

LSG vs KKR : कोलकाताकडून लखनऊचा दारूण पराभव, पॉइंट्स टेबलमध्ये मोठा उलटफेर

SCROLL FOR NEXT