Saam Tv Exit Poll: मुंबईत भाजप सर्वात मोठा पक्ष, ठाकरेंना किती जागा? पाहा सत्तेत कोण येणार

BMC Election 2026: मुंबई महानगर पालिका निवडणुकीमध्ये भाजपला मोठं यश मिळण्याची शक्यता आहे. साम टीव्हीच्या एक्झिट पोलनुसार मुंबई ठाकरेंच्या हातून जाण्याची शक्यता असून भाजप सर्वात मोठा पक्ष ठरण्याची शक्यता आहे.

मुंबई महानगर पालिका निवडणुकीत कुणाची सत्ता येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मुंबई महानगर पालिकेचा एक्झिट पोल समोर आला आहे. सकाळ समूहाच्या एक्झिट पोलनुसार मुंबईत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. गेली २५ वर्षे सत्ता असलेल्या ठाकरेंच्या हातातून मुंबई महापालिका गेल्याचे दिसून येत आहे. मुंबइ महानगर पालिकेवर महायुतीची सत्ता येण्याची शक्यता आहे. मुंबईमध्ये शिवसेना ठाकरे गट हा दुसरा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे.

सकाळ समूहाच्या एक्झिट पोलनुसार, मुंबईमध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला असून मुंबईत ८४ वॉर्डमध्ये भाजपचा उमेदवार विजयी होण्याची शक्यता आहे. शिवसेना शिंदे गट ३५ वॉर्डमध्ये आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट ३ वॉर्डमध्ये विजयी होण्याची शक्यता आहे. मुंबईमध्ये ठाकरे बंधूंनी युतीमध्ये निवडणूक लढवली होती. ठाकरेंच्या शिवसेनेला ६५ जागा मिळण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट २ आणि मनसेला १० जागा मिळण्याची शक्यता आहे. तर स्वबळावर निवडणूक लढवलेल्या काँग्रेसला २३ जागा मिळण्याची शक्यता आहे. तर मुंबईत इतर ५ जागांवर विजयी होण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com