Singer Sharda Iyengar Died Saam TV
मनोरंजन बातम्या

Singer Sharda Iyengar Passes Away : ज्येष्ठ गायिका शारदा अय्यंगार यांचे निधन; वयाच्या ८६ व्या वर्षी अखेरचा श्वास

Pooja Dange

Veteran Singer Sharda Rajan Iyengar Dies : 60 आणि 70 च्या दशकातील प्रसिद्ध गायिका शारदा राजन अय्यंगार यांनी आज 14 जून रोजी या जगाचा निरोप घेतला. शारदा या ८६ वर्षांच्या होत्या.

शारदा यांचा जन्म २५ ऑक्टोबर १९३७ रोजी तामिळनाडूतील एका ब्राह्मण कुटुंबात झाला. शारदा राजन अय्यंगार 'तितली उडी' या गाण्यासाठी खूप प्रसिद्ध आहेत.

शारदा यांना 1970 मध्ये आलेल्या 'जहां प्यार मिले' या चित्रपटात 'बात जरा है आप की' हा कॅबरे गाण्यासाठी महिला पार्श्वगायिकेचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता. (Latest Entertainment News)

1966 मध्ये आलेल्या 'सूरज' चित्रपटातील 'तितली उडी उड जो चली फूल ने कहा आजा मेरे पास तितली काहे में चली आकाश' हे गाणे त्यांच्या कारकिर्दीतील सर्वात हिट गाणे होते.

शारदा यांना हे गाणे चित्रपट निर्माते राज कपूर यांनी ऑफर केले होते. राज कपूर यांनी शारदा यांना तेहरानमध्ये गाणे गाताना ऐकले होते. त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी शंकर जयकिशन यांच्यासोबत दीर्घकाळ काम केले आणि अनेक हिट गाणी दिली.

शारदा यांनी मोहम्मद रफी, आशा भोसले, किशोर कुमार, यशुदास, मुकेश आणि सुमन कल्याणपूर यांसारख्या दिग्गजांसोबत काम केले. (Celebrity)

शारदा यांनी वैजयंतीमाला, सायरा बानो, हेमा मालिनी, शर्मिला टागोर, मुमताज, रेखा आणि हेलन यांसारख्या आघाडीच्या अभिनेत्रींना आपला आवाज दिला आहे. इतकेच नाही तर शारदा या पहिली भारतीय महिला गायिका होत्या ज्यांचा पॉप अल्बम लाँच झाला. 1971 मध्ये लाँच झालेल्या या अल्बमचे नाव Sizzlers असे होते.

शारदाने बॉलिवूडशिवाय तेलुगू, मराठी, इंग्रजी आणि गुजराती भाषांमध्येही गाणी गायली आहेत. त्यांचा गझल अल्बम 'अंदाज-ए-बयान' 2007 साली प्रसिद्ध झाला, जो मिर्झा गालिबच्या लोकप्रिय गझलांवर आधारित होता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Explainer : लोकसभा ते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या एकाचवेळी निवडणुका शक्य आहेत का? 'वन नेशन, वन इलेक्शन'चा फायदा नक्की कोणाला? वाचा सविस्तर

Konkan : कोकणातील 'बटरफ्लाय बीच'चा नजारा इतका भारी की गोवाही विसराल

Maharashtra News Live Updates: देशातील सर्वात भ्रष्ट परिवार म्हणजे काँग्रेसमधील शाही परिवार - मोदी

Maharashtra Politics : अजित पवारांची सावध भूमिका, राष्ट्रवादी काँग्रेस विधानसभेला मुस्लिम उमेदवार मैदानात उतरवणार!

Dharangaon News : पोहण्यासाठी विहिरीत उडी मारली पण बाहेर आलाच नाही; तरुणाचा बुडून मृत्यू

SCROLL FOR NEXT