Tiger 3 5th Day Box Office Collection Saam Tv
मनोरंजन बातम्या

Tiger 3 5th Day Collection: भाईजानच्या ‘टायगर ३’चा वेग मंदावला, कमाईमध्ये मोठी घसरण, पाचव्या किती कोटी कमावले?

Chetan Bodke

Tiger 3 5th Day Box Office Collection

बॉलिवूड अभिनेता सलमान खानचा ‘टायगर ३’ चित्रपट सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला आहे. चित्रपटाला समीक्षकांसह प्रेक्षकांनीही चांगलाच प्रतिसाद दिला आहे. चित्रपट थिएटरमध्ये दिवाळीच्या शुभमुहूर्तावर प्रदर्शित झाला आहे.

दिवाळीच्या सुट्ट्यांचा चित्रपटाला चांगलाच फायदा झालेला दिसून येत आहे. प्रदर्शित झाल्यापासून चित्रपट बॉक्स ऑफिसवर धडाकेबाज कमाई करताना दिसत आहे. ‘टायगर ३’च्या कमाईमध्ये रिलीजच्या पाचव्या दिवशी चांगलीच घसरण पाहायला मिळत आहे. चौथ्या दिवसाप्रमाणे, पाचव्या दिवशीही चित्रपटाच्या कमाईचा आकडा खाली घसरला.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

‘टायगर ३’ भारतासह परदेशामध्ये दिवाळीच्या शुभमुहूर्तावर अर्थात लक्ष्मीपुजनच्या दिवशी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. सॅकल्निकच्या अहवालानुसार, ‘टायगर ३’ ने रिलीजच्या पहिल्या दिवशी ४४.५ कोटींची कमाई केली होती. दुसऱ्या दिवशी ५९.२५ कोटी रुपये आणि तिसऱ्या दिवशी ४४.३ कोटी रुपये कमावले आहे. (Bollywood)

खरंतर चौथ्या दिवसापासून ‘टायगर ३’च्या कलेक्शनमध्ये घट झालेली पाहायला मिळत आहे. ‘टायगर ३’ ने चौथ्या दिवशी २१.१ कोटी तर आता पाचव्या दिवशी चित्रपटाने केवळ १८.५० कोटींची कमाई केली आहे. पाचव्या दिवसाच्या कमाईचे वृत्त सॅकल्निक या ट्रेड ॲनालिस्टने या संबंधितची माहिती दिली आहे. (Bollywood Film)

‘टायगर ३’ या चित्रपटाने पाच दिवसामध्ये १८७. ६५ कोटींचा टप्पा गाठला आहे. लवकरच चित्रपट २०० कोटींच्याही क्लबमध्ये सामील होईल. चित्रपटाची ३०० कोटींच्या क्लबमध्ये निर्मिती झाली आहे. कमाईच्या बाबतीत सलमान- कतरिनाच्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त धमाका केला आहे.

‘टायगर ३’मधील सलमान खानच्या ढांसू एन्ट्रीपासून ते कतरिना कैफच्या जबरदस्त अ‍ॅक्शनपर्यंत सर्वकाही ‘टायगर ३’ मध्ये पाहायला मिळत आहे. इमरान हाश्मीने त्याच्या ग्रे-शेडेड अवताराने प्रेक्षकांना प्रभावित केले आहे. ‘टायगर ३’मध्ये सलमान खानच्या अ‍ॅक्शनसोबतच शाहरुख खान आणि हृतिक रोशनचाही कॅमिओ पाहायला मिळत आहेत.

‘टायगर ३’चे दिग्दर्शन मनीष शर्मा यांनी केले असून चित्रपटाचे लेखन आदित्य चोप्राने केले आहे. सध्या सगळीकडे ‘टायगर ३’या चित्रपटाची हवा पाहायला मिळत आहे. (Entertainment News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Modi In Thane: मराठी, मेट्रो अन् मविआ; ठाण्यात PM मोदींची विरोधकांवर चौफेर टीका

Pune Devi Temple : मुंबईपासून हाकेच्या अंतरावर आहे जम्मूच्या वैष्णो देवी मंदिराची प्रतिकृती

VIDEO : उद्धव ठाकरेंचा मोदी-शिंदेंवर 'ठाकरी बाण'

Marathi News Live Updates : काँग्रेसची ज्या राज्यात सत्ता येते ती राज्य उध्वस्त होतात, नरेंद्र मोदी

Fashion Tips : बॅगी जीन्ससोबत ट्राय करा 'हे' टॉप्स, फॅशन ट्रेंडमध्ये दिसाल स्टायलिश!

SCROLL FOR NEXT