Teachers Day Special Saam Tv
मनोरंजन बातम्या

Teachers Day Special : शिक्षक दिनानिमित्त 'हे' ५ चित्रपट नक्की पाहा

बॉलिवूडमधील असे अनेक चित्रपट आहेत, जे शिक्षक आणि विद्यार्थांच्या नात्याची गोष्ट सांगतात.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : देशाचे दुसरे राष्ट्रपती आणि भारताचे पहिले शिक्षण मंत्री डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिवसा निमित्ताने देशभरात ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिन (Teachers Day)साजरा केला जातो. आजच्या दिवशी आपले शिक्षकांचा सन्मान केला जातो. प्रत्येक विद्यार्थाच्या यशात शिक्षकांचे अमुल्य योगदान असते. बॉलिवूडमधील असे अनेक चित्रपट(Movie) आहेत की जे शिक्षक आणि विद्यार्थांच्या नात्याची गोष्ट सांगतात.

आज शिक्षक दिनाचे औचित्य साधत आम्ही तुम्हाला अशा काही चित्रपटांबद्दल सांगणार आहेत की, त्या चित्रपटांमध्ये शिक्षक आणि विद्यार्थांच्या नात्याची रंजक गोष्ट सांगतात. चला तर जाणून घेऊया या ५ चित्रपटांबद्दल.

सुपर ३० (Super 30)

या चित्रपट मुख्य भूमिकेत ह्रतिक रोशन आणि मृणाल ठाकुर आहेत. चित्रपटात ह्रतिकने गणिततज्ञाची (Mathematician) भूमिका साकारली आहे. जो ३० आयआयटी मधील विद्यार्थांना शिकवत असतो. चित्रपटात दाखवल्याप्रमाणे आनंद त्याच्या नोकरीच्या काळात शिक्षकांमध्ये आणि विद्यार्थांमध्ये एक चांगले नाते निर्माण करतो. या चित्रपटातून शिक्षकांचे आणि विद्यार्थांचे नाते कसे असावे हे दाखवले आहे.

हिचकी (Hichki)

राणी मुखर्जी च्या 'हिचकी' या चित्रपटात एका शिक्षिकेला बोलण्याचा आजार असतो. तिला चित्रपटात टॉरेट सिंड्रोम असल्याचे दाखवण्यात आले आहे. चित्रपटात राणीने नैना माथूर नामक शिक्षिकेची भूमिका साकारली आहे. गरीब आणि अभ्यासात कमकुवत असणाऱ्या विद्यार्थांना शिकवण्याचे काम तिला दिले जाते. नैना कशाप्रकारे विद्यार्थांचे आयुष्य बदलते हे या चित्रपटात दाखवले आहे.

3 इडियट (3 idiots)

३ मित्रांवर आधारित '3 इडियट' चित्रपटात मुख्य भूमिकेत अमिर खान, आर माधवन आणि शरमन जोशी भारतीय शिक्षण व्यवस्थेवर भाष्यकरताना दाखवले आहे. चित्रपटात हॉस्टेलवरील मित्रांमधील धमाल मस्ती दाखवली आहे. चित्रपटात रॅंचो आणि प्राध्यापक वीरू सहस्त्रबुद्धे यांच्यामधील संबंध कसे घट्ट होतात? तसेच चित्रपटात प्रा. सहस्त्रबुद्धेंची मानसिकता बदलण्यात करावी लागणारी तारेवरची कसरत दाखवण्यात आली आहे.

निल बट्टे सन्नाटा (Nil Battey Sannata)

स्वरा भास्करचा निल बट्टे सन्नाटा हा चित्रपटात आई-मुलगी आणि शिक्षिका-विद्यार्थिनी यांच्यातील नातेसंबंधांवर आधारित आहे. स्वरा चित्रपटात एका आईच्या भूमिकेत असून सोबतच आपल्या मुलीला आयएएस अधिकारी बनवण्यासाठी मार्गदर्शन करताना दाखवले आहे.

तारे जमीन पर (Taare Zameen Par)

आमिर खान सोबतच दर्शील सफारीची या चित्रपटात महत्त्वाची भूमिका होती. यामध्ये दर्शील डिस्लेक्सिया हा आजार असतो. आमिरने रामशंकर निकुंज नावाच्या एका शिक्षकाची भूमिका साकारली आहे, तर दर्शीने इशान अवस्थीची भूमिका साकारली आहे. रामशंकर इशानला अभ्यासात कशी मदत करतो. हे या चित्रपटात दाखवण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Aadhaar Verification : आधार कार्ड खरे की खोटे? फसवणुकीपासून सावध राहण्यासाठी आवश्यक टिप्स

Pune Ganpati Visarjan: पुण्यातील मानाच्या पाचही गणपतींचे भव्य विसर्जन संपन्न|VIDEO

Maharashtra Live News Update: शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला राज ठाकरे शिवतीर्थावर जाणार

Breaking News : ऐन गणेशोत्सवात मोठी दुर्घटना; रोपवे तुटल्याने ६ जणांचा मृत्यू

OBC/ Maratha Reservation: मुख्यमंत्री फडणवीसांसमोर आखणी एक आव्हान; उपराजधानीत निघणार भव्य मोर्चा

SCROLL FOR NEXT