Hrithik Roshan : ह्रतिक रोशनने 'या' कारणामुळे नाकारला 'ब्रम्हास्त्र २', त्याऐवजी करणार 'हे' दोन सिनेमे!

ह्रतिक रोशनला 'ब्रम्हास्त्र २'साठी 'या' भूमिकेसाठी विचारले होते, पण त्याने चित्रपटासाठी नकार दिला.
hrithik roshan
hrithik roshan saam tv
Published On

मुंबई : अभिनेता ह्रतिक रोशन(Hrithik Roshan) त्याचा आगामी चित्रपट 'विक्रम वेधा'(Vikram Vedha)च्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. 'विक्रम वेधा' या सिनेमात ह्रतिक रोशन आणि सैफ अली खान मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. 'बॉलिवूडचा ग्रीक गॉड' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ह्रतिक रोशनला 'ब्रम्हास्त्र २'साठी 'देवा'या भूमिकेसाठी विचारले होते, पण त्याने चित्रपटासाठी नकार दिला.

hrithik roshan
Amruta Khanvilkar: 'लावणी श्रृंगार व प्रेरणादायी'; अमृता खानविलकरने गणेशोत्सवात लावणी आयोजकांचे टोचले कान!

दिग्दर्शक अयान मुखर्जी आणि निर्माता करण जोहरने 'ब्रम्हास्त्र २' मधील देवा या भूमिकेसाठी विचारले होते. परंतु ह्रतिकने 'ब्रम्हास्त्र २' चित्रपटाला नाकार देत, 'क्रिश ४' आणि 'रामायण' करण्याचा निर्णय घेतला आहे. व्हिएफएक्ससाठी जास्त वेळ द्यावा लागतो म्हणून 'ब्रम्हास्त्र २' सिनेमाला नकार दिला असल्याचे बोलले जात आहे. ह्रतिकने दिग्दर्शक आणि निर्मात्यांना चित्रपट नाकारण्याचे कारण फोन करून कळवलं. ह्रतिकने भूमिकेला नकार दिल्यानंतर नव्या अभिनेत्याच्या शोधात दिग्दर्शक अयान मुखर्जी आहे. या पात्रासाठी एक वेगळं रूप, वेगळा अंदाज अपेक्षित आहे. त्यामुळे ही भूमिका कोण करणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

hrithik roshan
२४ वर्षांच्या संसारानंतर सीमा सजदेहने सोहेल खान सोबत का घेतला घटस्फोट? केला खळबळजनक खुलासा

'ब्रम्हास्त्र' चित्रपट प्रदर्शनासाठी आता काही दिवसच बाकी आहेत.परंतु, चित्रपटाला बॉयकॉटच्या ट्रेंडनेही वेढले आहे. चित्रपटाच्या टिमकडून चित्रपट चांगलीच कमाई करणार अशी अपेक्षा केली जात आहे. अलिकडेच, हैदराबादमध्ये 'ब्रह्मास्त्र' सिनेमाच्या प्रमोशनसाठी संपूर्ण टीम हजर होती. प्रमोशन दरम्यान, दाक्षिणात्य दिग्दर्शक एसएस राजामौली, ज्युनिअर एनटीआर, नागार्जुन ही इव्हेंटसाठी उपस्थित होते. करण जोहरने बॉलिवूड आणि दाक्षिणात्य सिनेमा संस्कृतीवर भाष्य केले. अयान मुखर्जी देखील या कार्यक्रमाला उपस्थित होता. त्यानं देखील सिनेमातील काही गोष्टींचा उलगडा केला आहे. बिगबजेट असलेला 'ब्रह्मास्त्र' सिनेमा ३०० ते ३५० कोटी रुपयांत तयार करण्यात आला आहे. हा सिनेमा तयार होण्यासाठी नऊ वर्षे लागली. अखेर सिनेमा येत्या ९ सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com