Delhi Crime Season 2 Saam Tv
मनोरंजन बातम्या

Delhi Crime Season 2 Trailer: शेफाली शाह पुन्हा डीसीपी वर्तिका सिंगच्या भूमिकेत, यावेळी करणार मर्डर मिस्ट्री साॅल्व

गेल्या वर्षी आंतरराष्ट्रीय एमी पुरस्कार जिंकणारा पहिला भारतीय शो बनून इतिहास रचणाऱ्या 'दिल्ली क्राइम'च्या दुसऱ्या सीझनचा ट्रेलर रिलीज झाला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Delhi Crime Season 2 Trailer | मुंबई : गेल्या वर्षी आंतरराष्ट्रीय एमी पुरस्कार जिंकणारा पहिला भारतीय शो बनून इतिहास रचणाऱ्या 'दिल्ली क्राइम'(Delhi Crime)च्या दुसऱ्या सीझनचा ट्रेलर रिलीज झाला आहे. या सीरीजने सर्वोत्कृष्ट ड्रामा सीरीज हा किताब पटकावला होतं. आता त्याच्या दुसऱ्या सीझनचा दमदार ट्रेलरही नेटफ्लिक्सने प्रदर्शित केला आहे. या ट्रेलरमध्ये अभिनेत्री शेफाली शाह(Shefali Shah) पुन्हा एकदा डीसीपी वर्तिका सिंगच्या भूमिकेत दिसणार आहे.

शेफाली शाहच्या टीममध्ये नीती सिंगची भूमिका रसिका दुग्गल आणि भूपेंद्र सिंगची भूमिका राजेश तैलंगने केली असून या सीरीजमधील अन्य काही कलाकार मागील सीझनप्रमाणेच राहतील. आदिल हुसैन, अनुराग अरोरा, सिद्धार्थ भारद्वाज आणि गोपाल दत्त सारखे कलाकार 'दिल्ली क्राइम २'मध्येही दिसणार आहेत.

या दुसऱ्या सीझनच्या ट्रेलरमध्ये एकामागून एक मृत्यू कसे घडत आहेत हे दाखवण्यात आले आहे आणि यावेळी दिल्ली पोलीस सीरियल किलरच्या शोधात आहेत. ट्रेलरमध्ये, शहरातील अशी परिस्थिती हाताळतान्यासाठीचा डीसीपी वर्तिका सिंगचा संघर्ष या ट्रेलरमध्ये दिसत आहे.

'दिल्ली क्राइम'चा पहिला सीझन सनडान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये २०१९ मध्ये इंडी एपिसोड कॅटेगरीमध्ये प्रदर्शित झाला होता, त्या वेळी या वेब सीरीजचे पहिले दोन भाग प्रदर्शित करण्यात आले होते. या फिल्म फेस्टिव्हलच्या वेळी नेटफ्लिक्सने ही वेब सीरीज विकत घेतली होती. रिची मेहता यांनी 'दिल्ली क्राइम'च्या पहिल्या सीझनचे लेखन, दिग्दर्शन आणि निर्मिती केली होती. 'दिल्ली क्राइम'च्या पहिला सीझन दिल्लीतील सामूहिक बलात्कार घटना आणि पोलिस तपासावर आधारित होता.

बॉलिवूड अभिनेत्री शेफाली शाहने तिच्या इन्स्टाग्राम हँडलवर 'दिल्ली क्राइम सीझन २' चा ट्रेलर शेअर केला आहे. हे शेअर करत शेफालीने लिहिले की, 'गुन्हेगारांची टोळी, दहशतीत शहर. डीसीपी वर्तिका आणि तिची टीम आगामी गुन्ह्यासाठी सज्ज आहेत का? दिल्ली क्राइम सीझन 2 चा ट्रेलर पाहा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Genelia Deshmukh: माजी मुख्यमंत्र्यांच्या सुनबाईंचा स्वॅग भारी!

Indian Railway : रेल्वेची आरक्षण यादी ८ तास आधी जाहीर होणार | VIDEO

Sanjay Raut : महाराष्ट्राच्या नादाला लागू नको नाहीतर पटकनी काय आहे ते दाखवू-राऊतांचा दुबेंना इशारा

Bribe Case : प्रसूती रजा मंजुरीसाठी मागितले ३६ हजार; मुख्याध्यापिकेसह लिपिक ताब्यात

CM Fadnavis: मीरा भाईंदर मोर्चाला परवानगी का दिली नाही? CM फडणवीसांनी सांगितलं कारण; मनसेवर डागली तोफ

SCROLL FOR NEXT