Bhaubali Movie Saam Tv
मनोरंजन बातम्या

Marathi Movie : दोन वैऱ्यांची धमाल विनोदी कहाणी ; भाऊबळी चित्रपटाचा दमदार ट्रेलर रिलीज

'भाऊबळी' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : 'भाऊबळी'(BhauBali) चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून सोशल मीडियावर सर्वत्र 'भाऊबळी' ची चर्चा रंगत आहे. 'भाऊबळी' च्या ट्रेलरला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत असून विनोदाचा उत्तम आशय असलेल्या या चित्रपटाच्या ट्रेलरला लाखोंमध्ये व्ह्यूज मिळाले आहेत. मनोज जोशी, किशोर कदम(Kishor Kadam), मेधा मांजरेकर, ऋषिकेश जोशी, संतोष पवार, प्रियदर्शनी इंदलकर, आशय कुलकर्णी, रेशम टिपणीस आणि अनेक कमालीच्या विनोदवीरांसह प्रेक्षकांचे मनोरंजन करायला 'भाऊबळी'चे कलाकार सज्ज झाले आहेत.

प्रेक्षकांची चित्रपट पाहण्याची उत्सुकता कमालीची वाढली आहे. नुकताच सोशल मीडियावर 'भाऊबळी' चा नवा पोस्टर झळकला असून मनोज जोशी यांच्या विरोधी भूमिकेत किशोर कदम दिसत आहेत. त्यांच्यातल्या वैऱ्याची कमाल विनोदी कहाणी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या दोघांच्या युद्धाचे नेमके कारण चित्रपट पाहिल्यावरच कळेल. विनोदी आशय काही तरी मोलाची शिकवण देऊन जाणारा हा चित्रपट असेल असं वाटत आहे.

झी स्टुडिओज प्रस्तुत, समीर पाटील दिग्दर्शित 'भाऊबळी' हा विनोदी चित्रपट येत्या १६ सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाचे निर्माते नितीन वैद्य, निनाद वैद्य, अपर्णा पाडगावकर आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

‘कौन बनेगा करोडपती 17’ ला पहिला करोडपती मिळाला; उत्तराखंडाचा आदित्य कुमारने जिंकली इतकी रक्कम

Viral Video : गोळ्या घालेन... पिस्तूल रोखत धमकावले, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बड्या नेत्याचा कार वर्कशॉपमध्ये राडा

Maharashtra Rain Live News : उल्हासनगरमधील जसलोक हायस्कूलजवळील घराची भिंत कोसळली

House Renting: घर भाड्याने देताना 'या' महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा

दारूच्या नशेत महिलांनी घातला राडा, मुंबई-पुणे हायवेवर तुफान हाणामारी | VIDEO

SCROLL FOR NEXT